शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक नेत्यांनी उद्योजकांच्या अडचणी सोडवाव्यात : अजित पवार ​​​​​​​

By दीपक देशमुख | Updated: April 9, 2023 17:59 IST

"सातारा एमआयडीसीत होतकरू उद्योजकांना जागा मिळाव्या"

सातारा : उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे त्या-त्या भागातील स्थानिक नेत्यांचे कर्तव्य आहे. सातारा शहरानजीक एमआयडीसीमध्ये मोकळे प्लॉट आहेत. पण या ठिकाणी होतकरू नवोद्योजकांना जागा मिळत नाही. स्थानिक नेत्यांनी थोडा दिलदारपणा दाखवून उद्योजकांच्या अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

वाढे फाटा, सातारा येथील देविका मंगल कार्यालयात मराठा बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित मराठा उद्योजक पुरस्कार व पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक नामदेवराव जाधव, मराठा बिझनेस फोरमचे कार्यकारी अध्यक्ष अरुण पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, हेमंत बर्गे, फोरमचे जिल्हाध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष मनोज देशमुख, राजेंद्र सावंत, जगदीश शिर्के, वैशाली निंबाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, मराठा तितुका मेळावा उद्योजक त्यातून घडावा या हेतूने मराठा बिजनेस फोरम कार्यरत असून मराठा उद्योजक घडवण्याचे आव्हानात्मक काम संघटना करत आहे. मराठा समाज एकत्र येत नाही, उद्योगाकडे वळत नाही असे म्हटले जाते. पण सगळ्यांना एकाच फूटपट्टीत मोजणे योग्य नाही अनेक मराठा उद्योजकांनी सातारात नव्हे तर राज्यात देशात तसेच बाहेरील देशातही आपला नावलौकिक केला आहे. यामुळे मराठा समाजही उद्योगात यशस्वी होऊ शकतो याची खात्री बाळगता येईल.

कृती इतकेच बोलणंही महत्त्वाचंशिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानातून युवकांना प्रेरणा मिळते. ते नेहमी बोलतात की बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची. पण नामदेवराव व्याख्यानांचेही शुल्क घेतात. त्यामुळे जे जेव्हा बोलताना कृती महत्त्वाची म्हणतील तेव्हा बाेलणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचे युवकांनी सांगावं. अजित पवार यांच्या या कोपरखळीला उपस्थितांसह जाधव यांनीही खळखळून हसत दाद दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार