शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खोल कोसळला, चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 19:26 IST

चालकाला डुलकी लागल्यानेच हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवराज पेट्रोलपंपाजवळ रविवारी पहाटे पाच वाजता भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खोल कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सर्व्हिस रस्त्यावर एकही वाहन नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. चालकाला डुलकी लागल्यानेच हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदाबादहून बेंगलोरकडे मालट्रक (केए ५१ एबी ४४७०) निघाला होता. साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खाेल कोसळला. मोठा आवाज झाल्याने महामार्गालगत राहाणारे आजूबाजूचे नागरिक झोपेतून जागे झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ट्रकमधून बाहेर काढले. यात चालक गंभीर जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळी आठपर्यंत ट्रक सर्व्हिस रस्त्यावरच होता. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. सरतेशेवटी शहर पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्यातून बाजूला केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात ट्रकची समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघातsatara-pcसातारा