शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

वीस रुपयांसाठी गमावला जीव

By admin | Updated: December 2, 2014 00:25 IST

पुणे जिल्ह्यातील घटना : दोन लुटारूंनी केला माणवासीयाचा खून

सातारा : मूळच्या माण तालुक्यातील रहिवाशाला केवळ वीस रुपयांसाठी जीव गमवावा लागला. पुणे जिल्ह्यातील काळेपडळ येथे दोघांनी डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.पोपट किसन आवटे (मूळ रा. माण, सध्या रा. काळेपडळ, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास काळेपडळ येथील रेल्वे फाटकाजवळून ते निघाले होते. त्यावेळी संदीप ऊर्फ सोन्या दत्तात्रय राख (वय २०) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २०, दोघे रा. हडपसर, मूळ सोलापूर) या दोघांनी त्यांना गाठले. गाडीचा धक्का मारून त्यांना खाली पाडले.त्यांच्याशी वाद घालत झटापट करून खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न दोघांनी केला. आवटे यांनी विरोध केला असता त्यांना मारहाण करून या दोघांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. खिशातील रक्कम आणि दोन मोबाइल घेऊन त्यांनी पळ काढला. आवटे यांच्या खिशात अवघे वीस रुपये होते.पोलिसांना आवटे यांचा मृतदेह सापडला होता; मात्र खुनाचे कारण आणि आरोपींबद्दल माहिती मिळत नव्हती. निरीक्षक सुनील यादव यांना राख आणि भालेराव यांच्याबद्दल माहिती मिळताच त्यांनी सापळा लावून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाइल आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भालेराव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)