शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यप्रेमींना संमेलनाची माहिती मिळणार एका क्लिकवर, संकेतस्थळाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:53 IST

ऐतिहासिक सातारा नगरीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता तंत्रज्ञानाची जोड

सातारा : ‘ऐतिहासिक सातारा नगरीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. संमेलनासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळामुळे जगभरातील साहित्यप्रेमींना संमेलनाची माहिती एका क्लिकवर मिळेल. शिवाय हे संमेलन जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहचेल,’ असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात नंदकुमार सावंत म्हणाले, देश-परदेशातील मराठी बांधवांना सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्वांगीण माहिती उपलब्ध व्हावी, तसेच डिजिटल स्वरूपात दस्त ऐवजीकरण व्हावे, हा संकेतस्थळ निर्मितीचा उद्देश आहे. विनोद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले तर मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी उपस्थितांचे आभार मानले. संकेतस्थळ निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Literature festival information now available with a click; website launched.

Web Summary : The 99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Satara goes digital! A new website provides global access to information about the literary event, ensuring worldwide reach, according to Minister Shivendrasinharaje Bhosle. The website launch aims to provide comprehensive details and digital documentation.