शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडच्या इतिहासाला उजाळा : भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 21:09 IST

छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे.

ठळक मुद्देमशाल महोत्सव ; राज्यभरातील शिवभक्तांची हजेरीदुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने. कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून.

महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून हा ‘मशाल महोत्सव’ याची देही याची डोळा अनुभवला.

चतुर्थीदिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यातआली.

किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता. दोन घटांची परंपरा आजही कायम किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने. कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरूआहे.प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास नवरात्रौत्सवातील चतुर्थीला ३५८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शुक्रवारी किल्ल्यावर ३५८ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर