शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विरळी-झरे रस्त्यावरील खचलेल्या पुलावर जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 17:29 IST

विरळी-झरे रस्त्यावरील विरळी येथील ओढ्यावरील पूल पावसाच्या पाण्याने तुटला असल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरवस्था झालेल्या या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, पालक आणि नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देविरळी-झरे रस्त्यावरील खचलेल्या पुलावर जीवघेणी वाहतूकअपघाताची शक्यता : पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांतून मागणी

कुकुडवाड : विरळी-झरे रस्त्यावरील विरळी येथील ओढ्यावरील पूल पावसाच्या पाण्याने तुटला असल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरवस्था झालेल्या या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, पालक आणि नागरिकांतून होत आहे.विरळी -झरे हा रस्ता सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांच्या मधील दुवा असून, तीर्थक्षेत्र गोंदवलेकर महाराज गोंदवले बुद्रुक या ठिकाणी जाणारा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून भाविकांच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर जातात. तसेच पुलापासून काही मीटर अंतरावर विरळी हायस्कूल असल्याने बागलवाडी, कोरेवाडी, आटपाडकरवस्ती येथून विद्यार्थी सायकलवरून शाळेला येतात.

पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूल बऱ्याच ठिकाणी खचला आहे. या ठिकाणी पुलाची दुरवस्था झाल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे केंद्र ठरत असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या ठिकाणचा अर्धा रस्ता खचून गेला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना करावी. तसेच पुलाच्या खाली असणाऱ्या नलिकांच्या संख्या वाढवून चांगल्या दर्जाचा पूल तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर