शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

जनुकीय बदलाने बिबटे अधिवासच विसरले, मानवाशी संघर्ष वाढणार!

By संजय पाटील | Updated: February 21, 2024 11:51 IST

संजय पाटील कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शिवारातच नव्हे, तर अगदी ...

संजय पाटीलकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शिवारातच नव्हे, तर अगदी घरातही त्यांनी शिरकाव केला आहे. गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे. जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वत:चा अधिवास मानलाय. त्यामुळे शासनाने जरी बिबट्यांना जेरबंद करीत जंगलाच्या अधिवासात सोडले तरी ते पुन्हा शिवारातच वावरतील, अशी भीती प्राणितज्ज्ञांना आहे.बिबट्या हे हिंस्त्र श्वापद; पण चोरटा शिकारी. रानडुक्कर, श्वान, शेळ्या, मेंढ्या हे त्याचं प्रमुख खाद्य. शिवारात हे खाद्य त्याला मुबलक प्रमाणात मिळतं. नाहीच मिळालं तरी प्रसंगी खेकडेही तो खातो. कोणत्याही मार्गाने तो आपली भूक भागवतो.कऱ्हाडसह पाटण तालुक्यात सध्या जेवढे बिबटे वावरताहेत तेवढे बिबटे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही नाहीत. प्रकल्पातील बिबट्यांची संख्या पन्नास आहे, तर कऱ्हाड, पाटणच्या प्रादेशिक वनहद्दीत आणि शिवारात शंभरपेक्षाही जास्त बिबटे असावेत, असे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले, तर बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आताच हालचाली झाल्या नाहीत, तर जुन्नरसारखीच कऱ्हाड, पाटणची भविष्यातील परिस्थिती गंभीर असेल, अशी भीती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक नाना खामकर आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात जुन्नरपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात हा धोका गत काही वर्षांच्या तुलनेत कित्येक पटींनी वाढला आहे. तसेच पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस शेतीमध्ये तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा आणि काजूच्या बागांमध्येही बिबट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील जुन्नर विभागात २००१ आणि २००२ साली बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे ११ लोकांचा बळी गेला. वनविभागाने १०३ बिबट्यांना पकडून त्यांच्या शेपटीत विशिष्ट प्रकारची ‘चिप’ बसवून काही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्र, तर काहींना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त केले. तसेच सुमारे १६ बिबटे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. मात्र, एवढे करूनही जुन्नरमधील बिबट्यांचा प्रश्न सुटला नाही.

जंगल हा अधिवासच बिबट्या विसरले आहेत. उसाचे शेत हेच जंगल असल्याचा आनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील प्रादेशिक वनहद्दीत शंभरपेक्षा जास्त बिबटे असावेत. - नाना खामकर, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग