शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बिबट्या एकीकडे, अन् पिंजरा दुसरीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:37 IST

विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.

पाटण, दि. ६: मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.

मोरणा विभागात गेले काही दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला होता. वाडीकोतावडे, आंब्रग या विभागात रोज पंधरा दिवस शेळी, गाय, म्हैस आदी प्राण्यांवर हल्ले होत होते.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागच्या वतीने सापळाही लावण्यात आला होता. मात्र, पिंजरा लावल्यानंतर बिबट्याने हा परिसरत सोडून बाजूला असणाºया नोटोशी, कुसरुंड, आडदेव या परिसरात मोर्चा वळविला आहे. परिसरात सकाळ, सायकांळी आणि रात्री बिबट्याचे दर्शन होत आहे.

दोन दिवसांपूर्वी कुसरुंड-नाटोशी रस्त्यावर डॉ. प्रकाश वरेकर हे कुसरुंड येथील क्लिनिक बंद करून येत असताना वरेकरवाडी येथील प्राथमिक शाळेसमोर रस्त्यावर बिबट्या उभा होता. गाडीची लाईट पडल्याने तो बाजूला झाला.

डॉ. वरेकर गाडी वेगात घेऊन जात असताना काही अंतरापर्यंत त्याने गाडीचा पाठलाग केला. या प्रकारामुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाटोशी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे रात्री १२ वाजता काही ग्रामस्थ वरेकरवाडी येथील चौकात बसले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले.

यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या नजीकच्या उसाच्या शेतामध्ये पळाला. यामुळे कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे, आंब्रग या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मजुरांचा तुटवडा त्यात बिबट्याची भीतीमोरणा विभागात भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी काढणीची कामे सुरू आहेत. या कामाकरिता आधीच मजुरांची संख्या कमी असताना कुसरुंड, नाटोशी, आंब्रग, वाडीकोतावडे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिके चांगली येऊनही काढणीअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे.