शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांचा गैरवापर करून कर्जदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:14 IST

कर्ज मंजूर करून देणाऱ्यांनीच कर्जदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडे मोबाईल खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे बनवेगिरी करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकागदपत्रांचा गैरवापर करून कर्जदारांची फसवणूकतिघांना अटक ; महागडे मोबाईल केले खरेदी

सातारा : कर्ज मंजूर करून देणाऱ्यांनीच कर्जदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडे मोबाईल खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे बनवेगिरी करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.सुनयन सुमंत शुक्ल (वय ३१, रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. कौलखेड, अकोला), आतिक अफजल शेख (वय ३४, रा. गुरूवार पेठ, सातारा), प्रफुल्ल प्रकाश बुरूंगे (वय २४, रा. मालखेड, पो. बेलवडे. ता. कऱ्हाड ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनयन शुक्ल हा कर्ज प्रकरणे करणारा एजंट आहे. मागील दोन महिन्यांमध्ये त्याने फियार्दी अमीर फिरोज मुल्ला (रा. गोंदवले, ता. माण) यांच्या आईचे कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रे घेतली होती.

या कागदपत्रांचा परस्पर गैरवापर करुन मोबाईल खरेदीसाठी एका फायनान्समधून त्याने कर्ज प्रकरण मंजूर केले. ३६ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल त्याने खरेदी केला होता. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पथकाने गुन्ह्यांचा तपास केला. त्यात मुख्य संशयित सुनयन शुक्ल याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता अजूनही तीन साथीदारांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली.

एका फायनान्सचे सेल्स एक्झिकेटीव्ह प्रफुल्ल बुरूंगे, गौतम तोरणे या दोघांनी मदत केल्याचे समोर आले. आतिक शेख याला या प्रकाराची माहिती असतानाही त्याने सुनयन शुक्ल याच्याकडून मोबाइल विकत घेतला. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली.

कर्जदारांच्या बँक खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, हिम्मत दबडे-पाटील, नाईक शैलेश फडतरे, अमित माने, कॉन्स्टेबल स्वप्निल कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी या टोळीचा पदार्फाश केला.चार लाखांची फसवणूक..बनावट कागदपत्रे करून फसवणूक झालेले अद्यापपर्यंत आठ साक्षीदार समोर आले आहेत. या सर्वांची ४ लाख ३२ हजार ९५० रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर