वाठार स्टेशन : सन १९७८ मध्ये किन्हई गावाची विभागणी होऊन पुढे पेठ किन्हई हे स्वतंत्र गाव प्रशासनात आले. सन १९७८ पासून १९८९ पर्यंत सलग ११ वर्षे सरपंच व सातत्याने २४ वर्षे ग्रामपंचायत सभासद राहून चालू पंचवार्षिक योजनेसाठी पेठ किन्हईच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गुलाबभाई इनामदार यांच्यावर विश्वास दाखवून सरपंचपद दिले आहे.पेठ किन्हईची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न झाले. त्यामध्ये यमाईदेवी, पॅनेलच्या शोभा ढवळे, पूजा चिकाटे, सुरय्या इनामदार, पूजा भोसले, निर्मला कदम, महादेव भिसे, दिलीप मदने हे बिनविरोध निवडून आले. वॉर्ड नंबर २ (लक्ष्मी वॉर्ड)मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबभाई इनामदार यांच्याविरुद्ध मोहन जाधव हे उभे होते. त्यात मोहन जाधव यांचा पराभव झाला. मात्र, वॉर्ड क्र. ३ (मारुती वॉर्ड) मधून मोहन जाधव व विश्वास जाधव यांच्यात सरळ लढत झाली. त्यात मोहन जाधव निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत यमाईदेवी पॅनेलचे आठ व विरोधकांचा एक उमेदवार निवडून आला. सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये गुलाबभाई इनामदार यांची सरपंचपदी व महादेव भिसे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. (वार्ताहर)
सलग ३५ वर्षे पेठ किन्हईचे नेतृत्व
By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST