शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी गायीचा कोकणापर्यंत दबदबा----ही रानवाट वेगळी

By admin | Updated: January 11, 2016 00:49 IST

खातगुणच्या सुबोध जाधव यांची कामधेनू

खटाव तालुक्यातील खातगुण येथील शेतकरी सुबोध प्रभाकर जाधव यांच्याकडे असलेल्या चार वर्षीय लक्ष्मी देशी गायीने आत्तापर्यंत सातारा जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरही भरणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनात ‘उत्कृष्ट कामधेनू प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळविले आहे.कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग सिंधू कृषी औद्योगिक, पशुपक्षी, मत्स्य व्यवसाय प्रदर्शन व पर्यटन मेळा सन २०१५ या मध्ये उत्कृष्ट देशी गायीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. या प्रदर्शनात सर्व जातींच्या एकूण १२० गायी सहभागी करण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त या गायीला कण्हेरीमठ येथे सलग तीन वर्षे ‘कामधेनू’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच कऱ्हाडमधील यशवंत कृषी प्रदर्शनात सलग तीन वर्षे पुरस्कार मिळविला आहे. पुसेगाव येथील खिलार जनावरांच्या प्रदर्शनात सलग दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे. मावळ येथील जाणता राजा कृषी प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचा तर माणदेशी महोत्सवात प्रथम क्रमांक मिळविला आहे. एक प्रगतिशील शेतकरी सुबोध जाधव यांनी या गायीची अत्यंत सुदररीत्या निगा राखवी आहे. गोमुत्र तसेच शेणाचा वापर करून पिके घेतली जात आहेत. अवघी आठ महिन्यांचे असताना पुसेगाव यात्रेत भरणाऱ्या खिलार जनावरांच्या प्रदर्शनात वासरू घेतले होते. या गायीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी एकावेळी दोन वासरांना जन्म दिला आहे. देशी गायींची संख्या रोडावत आहे. परंतु देशी गायीचे गोमुत्र तसेच शेण आज शेतीसाठी तसेच पिकाला उत्तम आहे. बरेच शेतकरी गायीला पाहण्यासाठी येतात तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या घरी गाय असावी, असे वाटू लागले आहे. - सुबोध जाधव, शेतकरी