शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सासरचं धोतंर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:13 IST

धोतर नेसणाऱ्याची संख्या अत्यल्प,ग्रामीण भागातच घडतंय दर्शन

आॅनलाईन लोकमतऔंध (जि. सातारा), दि. २२ : धोतर व लुगडं म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ती महाराष्ट्रातील मराठमोळी जोडी आणि त्यांचा भारदस्त पेहराव. या वेशभूषेला देशभरात अनन्यसाधारण महत्त्व असून भारतीय संस्कृतीत हा पारंपरिक वस्त्रप्रकार आहे. परंतु सध्या बदलत्या व फॅशनच्या युगात हा वस्त्रप्रकार कालबाह्य होण्याच्या मार्गावर असून येणाऱ्या पिढीस सासरच धोतर व माहेरची साडी (लुगडं)हे चित्रपटातच पहावयास मिळणार, अशी परिस्थिती सध्या निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.शहरी भागात धोतर वापरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजावे इतकी असून ग्रामीण भागात ही तुरळक प्रमाणात जुनी मंडळी धोतर परिधान करतायत. मात्र तेही कुठेतरीच. धोतराची लांबी ४.५मीटर इतकी असून कमरेभोवती गुंडाळून पायातून लपेटून घेऊन कमरेपाशी गाठ देऊन ते नेसले जाते.स्वातंत्र्याच्या कालखंडात खादी गांधी टोपी, नेहरू शर्ट किंवा कुर्ता व त्यावर धोतर परिधान करण्याची एक पोशाख पद्धत होती. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हेही मोठया आवडीने धोतर घालत असत तसेच अलीकडेच म्हटले तर आण्णा हजारे, हरिभाऊ बागडे,सातारा- सांगली विधानपरिषदेचे आ.मोहनराव कदम हेही आपणास धोतराच्या पोशाखात दिसत आहेत.अलीकडे शहरी व ग्रामीण भागात वयोवृध्द तसेच सत्तरी गाठलेले देखील धोतर ऐवजी नाईट पँटीत व टी-शर्ट मध्ये दिसत आहेत.