शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine In Satara : कऱ्हाडात व्हॅक्सिन ऑन व्हिलला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 15:32 IST

Corona vaccine In Satara : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देकऱ्हाडात व्हॅक्सिन ऑन व्हिलला प्रारंभदोन व्हॅन उपलब्ध : वंचीत घटकांचे होणार लसीकरण

कऱ्हाड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, तहसिलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कोरबु आदी उपस्थित होते. शहरातील बुधवार पेठ व तालुक्यातील कोळे येथे लसीकरण सूरू करण्यात आले. यासाठी ३ हजार ६४० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.शहरासह ग्रामीण भागात ज्यांच्याकडे ओळखीचा पूरावा नाही असे व दूर्गम, वाड्या-वस्तीसह वंचित, वीटभट्टी कामगार, भंगार गोळा करणारे, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी ह्यव्हॅक्सीन आॅन व्हीलह्ण या उपक्रमातून लसीकरण करण्यात येणार असुन याचा लाभ सबंधित घटकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील वाडी-वस्तीवर ही रुग्णवाहिका जाणार असून तेथील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत.शहरातील नागरी आरोग्य केंद्राच्या मदतीने बुधवार पेठेसह झोपडपट्टीतील नागरिकांचे तसेच कोळे येथे रस्त्याकडेला वास्तव्यास असणाऱ्या भंगार गोळा करणाऱ्या कुटूंबातील सदस्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत एखाद्याकडे ओळखीचा कोणताही पूरावा नसला तरी त्याचे लसीकरण करण्यात येत आहे.

कोळे येथे एकाच ठिकाणी सुमारे शंभरजण वास्तव्यास असल्याने याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लसीकरण करण्यात आले. जिल्हा समन्वयक इरशाद तांबोळी यांच्यासह डॉ. विना काकडे, डॉ. मेघा अनूगडे, डॉ. खबाले यांच्यासमवेत पारिचारिका, आरोग्य सेविका व मदतनीस या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याKaradकराडSatara areaसातारा परिसर