शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या शेतातच ‘शेवटची तयारी’-

By admin | Updated: August 28, 2014 22:21 IST

तळीये : महसूल विभागाने पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी

संजय कदम - वाठार स्टेशन --कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील तळिये गावास स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नसल्याने स्वत:च्या शेतातच अंत्यसंस्कार करावे लागतात. वर्षानुवर्षे हीच परंपरा गावात सुरू असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी होत आहे.स्मशानभूमीबाबत अनेकदा ग्रामसभेत ठराव होतात. मात्र ग्रामस्थांमध्ये एकमत होत नसल्यामुळे आजतागायत स्मशानभूमीचा प्रश्न खोळंबला आहे. ‘स्मशानभूमी नसलेले गाव’ अशी ओळख तयार झाली आहे. तर गावातच रस्त्याकडेला तीनशे स्क्वेअर फूट जागेत मुस्लिम समाजाची दफनभूमी असून ही जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे एकावर एक थर देण्याशिवाय दुसरा पर्यायच या समाजबांधवांना राहिला नाही. सुमारे एक हजार लोकसंख्येचे तळिये गाव आहे. हे गाव शेतीप्रधान असून कांदा, बटाटा उत्पादनात अग्रेसर आहे. गावच्या मध्यभागातून तळहिरा ओढा जात असल्याने याठिकाणी यापूर्वी दशक्रिया विधी केले जायचे. मात्र, लोकवस्ती असल्याने या ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यास ग्रामपंचायतीचा विरोध आहे.‘लोकमत’ने यापूर्वीच या स्मशानभूमीच्या जागेसाठी आवाज उठविल्यानंतर तत्कालीन सरपंच सत्यवान चव्हाण यांनी गावाशेजारील स्वत:ची जागा देण्याची भूमिका घेतली. परंतु, यास ग्रामस्थांनीच विरोध केल्याने तो प्रश्न प्रलंबित राहिला. तर १५ आॅगस्टला स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संदीप मुसळे यांनी चार गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला. परंतु यावर आता ग्रामस्थांतून उलटसुलट चर्चा होत असल्याने स्मशानभूमीचा प्रश्न जैसे थे आहे.तळिये गावासाठी गावातून जाणाऱ्या तळहिरा ओढ्यात गावच्या पश्चिम बाजूकडील जमीन स्मशानभूमीसाठी देण्याबाबत शासनाने पुढाकार घेऊन जागा निश्चित केली तरच हा प्रश्न सुटेल, अन्यथा हा प्रश्न कायमच प्रलंबित राहील.- विमल चव्हाण, सरपंचशासकीय किंवा महसूल विभागाच्या हद्दीतील ओढ्यातच स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून स्मशानभूमीचा अनेक वर्षांचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.- बाळासाहेब देशमुख, ग्रामस्थजमीनच नाही त्यांचे काय?ज्यांना शेतीवाडी आहे, त्यांनी आपल्याच शेतात अंत्यसंस्कार करावे, हा जरी नियम असला तरी ज्यांना जमीनच नाही त्यांची मात्र मोठी अडचण होत आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मोठ्या समस्येसाठी एकमुखी ठोस भूमिका घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.