शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Satara: घावरी रस्त्यावर दरड कोसळली, मोरेवाडीतील २३ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले

By दीपक देशमुख | Updated: July 22, 2023 15:49 IST

जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा : जिल्ह्यात हवामान खात्याने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पश्चिम भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी - एरणे रस्त्यावर दरड कोसळली. धोम-बलकवडी धरणाात पाण्याची आवक वाढली असून वाढली असल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरेवाडी, ता. सातारा येथील आणखी २३ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी ते एरणे रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरड कोसळली. याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हटवून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला. धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी कृष्णा नदी पात्रात मध्ये सोडण्यात येणार आहे. बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  यवतेश्वर घाटातील धोकदायक सुमारे २० मीटर लांबीची दरड साेमवारी काढण्यात येणार असून या कालावधीत रस्ता बंद तर ठिकाणापासून कमीतकमी सुमारे तीनशे मीटर परिसरात मनुष्य व जनावरांना नेण्यास मनाई केली आहे.

महाबळेश्वरला ५१.९ तर पाटण तालुक्यात ३४ मि.मी. पावसाची नाेंद जिल्ह्याच्या पश्चिमेला धूवाँधार बरसणाऱ्या पावसाने पुर्वेला ओढ दिली आहे.  सातारा तालुक्यात ५.७, जावली ८.८, पाटण ३४, कराड  ११, कोरेगाव  २.२, खटाव – १.३, माण १.२, फलटण ०.८, खंडाळा २.१, वाई  ६.८, महाबळेश्वर ५१.९ असा पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यातील धरणात ४४ टक्के पाणीसाठाजिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवक सुरू असल्याने धरणातील ४४.२७ पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात सध्या ४३.१४ टीएमसी, धाेम धरणात ४.२१ टीएमसी, धाेम ३.२१, कण्हेर ३.४९, उरमोडी ४.१० आणि तारळी धरणात ४.१७ टीएमसी इतका साठा झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान