शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:09 IST

दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.

ठळक मुद्देधरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बसलेल्या आंदोलक राहिले उपाशी

सातारा : दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या ३६ दिवसांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी झालेले धरणग्रस्त सोमवारी दिवसभर उपाशी राहिले. आमचे काय चुकले, असा विचारविनिमय सकाळपासूनच धरणग्रस्तांमध्ये सुरु होता. प्रशासनाच्या असहकार्याबद्दल निषेधही व्यक्त केला.धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आपले घर- दार, शेतीवाडी, जन्मभूमी पाण्यात बुडवली, आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न दाखविली. आमच्या त्यागातून दुष्काळी भागाला पाणी मिळेल, या उदात्त हेतूने कसदार जमिनी धरणासाठी दिल्या; परंतु पुनर्वसनाची प्रक्रिया दिवसेंदिवस लांबतच गेली. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी या योजना तयार केल्या नाहीत, त्यामुळे मूळ हेतूनलाच धक्का बसला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.जास्त पावसाच्या भागातून धरणग्रस्तांचे कमी पावसाच्या भागात पुनर्वसन करण्यात आले; परंतु अद्याप या धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर तयार केले नाही. जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडून कुठल्याच प्रश्नांची सोडवणूक होत नाही. यामुळे धरणग्रस्तांच्या मनात चिड आहे. ३६ दिवस सलग आंदोलन करुनही प्रशासन हालत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी आता काय करावे? याबाबत अस्वस्थता पसरली आहे. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रकाश भातुसे, आनंदा सपकाळ, व्यंकटराव पन्हाळकर, शंकरराव चव्हाण, मोहन धनवे यांनी मनोगत व्यक्त केले.आता आंदोलनाची तीव्रता वाढवणारआता आंदोलन अधिक तीव्र करुन प्रशासनाला जाग आणण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने धरणग्रस्तांचा अंत पाहू नये, असा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर