शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पसरणी घाटात दरड कोसळली, दोन तासानंतर वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 16:11 IST

वाई-पाचगणी घाटात पहाटेच्या सुमारास दरडी कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

वाई : गेल्या दोन दिवसापासून जोरदार अवकाळी पाऊस सुरु असल्याने वाई - पाचगणी घाटात बुवा साहेबाच्या वर मुख्य रस्त्यावर आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरडी कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरड बाजूला करुन वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या टीमने दोन तासाच्या अथक प्रयत्नातून रस्ता मोकळा करीत वाहतूक सुरळीत केली. दरड कोसळल्याच्या या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशिन व कर्मचाऱ्यामुळे दरड हटविण्यास यश आले.सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तूरळक होती. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरडी कोसळण्याची भीती व पडणारा प्रचंड पाऊस यामुळे दरड हटविण्यात अडचणी येत होत्या. तरीही मोठ्या प्रयत्नांनी कोसळलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. शक्यतो घाटातून सावकाश प्रवास करून वाहतुकीचे नियम पाळावेत असे, आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन