शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

‘भूमिअभिलेख’चा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

जत पोलिसांत गुन्हा दाखल : आठ हजारांची लाच घेतली

जत : येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक (उमेदवार) सुरेश शंकर साळुंखे (वय ४५, रा. जत, मूळ रा. गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सांगली यांनी आज (गुरुवार) रंगेहात पकडले. ही कारवाई सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान कार्यालयातच करण्यात आली. याप्रकरणी सुरेश साळुंखे यांच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.विजय शिवाजी माने (वय ३५, रा. कैकाडी गल्ली, शिवानुभव मंडपजवळ, जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात त्यांनी विनंती अर्ज केला होता. अनेकवेळा विनंती करून व हेलपाटे मारुनही त्यांचे हे काम झाले नव्हते. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून देण्यासाठी सुरेश साळुंखे यांनी विजय माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु हे काम कायदेशीर असून नियमित आहे, त्यामुळे मी दहा हजार रुपये देणार नाही. फक्त आठ हजार रुपये देतो, असे माने यांनी साळुंखे यांना सांगितले होते. यासंदर्भात माने यांनी लाचलुचपत सांगली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानुसार आज लाचलुचपत सांगली विभागाने सापळा लावून, सुरेश यास आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सुरेश साळुंखे याचे मूळ गाव गावभाग गणेशवाडी, ता. शिरोळ आहे. तीन वर्षापूर्वी तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुनील लाळे यांनी त्याला येथे दैनंदिन कामासाठी बोलावून आणले होते. त्यामुळे या कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांचे खासगी काम तो करीत होता. त्यामुळे सर्वांची मर्जी त्याने संपादन केली होती. या कार्यालयात साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा होता. कार्यालयातील कर्मचारी व दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी उध्दट वर्तन करणे, मन मानेल तसे पैसे मागून कामाची पूर्तता करणे, अन्यथा काम करण्यास नकार देणे यामुळे त्याच्याविरोधात सतत तक्रारी होत होत्या. लाचलुचपत विभागाने या कार्यालयातील फक्त उमेदवारावरच कारवाई केली आहे. परंतु मुख्य सूत्रधार नामानिराळे आहेत. त्यांच्यावरही यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)वारस नोंदीसाठी लाचेची मागणीविजय माने (शिवानुभव मंडपजवळ जत) यांच्या वडिलार्जित घरजागेची वारस नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षक जत कार्यालयात सुरेश साळुंखे यांनी माने यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु माने यांनी आठ हजार रुपये देतो, असे सांगून साळुंखे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.४साळुंखे हा उमेदवार म्हणून काम करत असला तरी, त्याचा रुबाब मात्र अधिकाऱ्यापेक्षा जादा४मुख्य सूत्रधार नामानिराळे असून, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.