शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुठायत ‘अच्छे दिन’? जनतेचा भ्रमनिरास!

By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST

अजित पवारांचे टीकास्त्र : ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षक भरती रोखल्याने बेरोजगारीत वाढ; अठरा महिन्यांत युवकांची फरफट

रहिमतपूर : ‘राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षणमंत्र्यानी शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी आणली आहे. परिणामी, समाजात बेकारीचे प्रमाण वाढून बेरोजगार तरुणांच्या समस्या वाढत आहेत. १५ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या या सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली तरुण, शेतकरी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कोरेगावच्या सभापती रूपाली जाधव, सुनील खत्री, सुभाषराव शिंंदे, लक्ष्मीताई गायकवाड, जितेंद्र पवार, मानसिंंगराव जगदाळे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘सरकारला राज्यकारभार करता येत नाही. राज्यातील हजारो माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सहकारी क्षेत्रामध्येही जागा रिक्त आहेत. यासाठी शिक्षकांनी नागपूर अधिवेशनात मोर्चे काढले व उपोषणे केली तरी त्याची दखल घेतली जात नाही.आमचे सरकार असते तर नोकरभरती व दुष्काळासंदर्भात लगेच निर्णय घेऊन हजारो घरे आपल्या पायावर उभी केली असती.’कार्यक्रमास अ‍ॅड. नितीन भोसले, सागर पाटील, शाहूराज फाळके, शहाजी क्षीरसागर, अनिवाश माने, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अशोक पवार, संभाजी गायकवाड तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब सोळसकर यांचे भाषणे झाले. सोमनाथ गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)