शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महसूल विभागाचा जखिणवाडीत कुंभमेळा

By admin | Updated: October 1, 2015 00:30 IST

‘विस्तारित समाधान मेळावा २०१५’ : शासनाच्या ११ स्टॉल्सद्वारे ६७ सेवा आॅन दि स्पॉट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मलकापूर : महाराजस्व अभियानांतर्गत शासनाचा ‘विस्तारित समाधान मेळावा २०१५’ चे जखिणवाडीत आयोजन करण्यात आले होते. ११ स्टॉल्सच्या माध्यमातून तब्बल ६७ सेवांची पूर्तता आॅन दि स्पॉट देण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जणू जखिणवाडीत कुंभमेळाच भरला होता. जखिणवाडीची महसूल विभागाच्या वतीने विस्तारित समाधान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली. त्यानुसार बुधवारी जखिणवाडीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जखिणवाडी, आटके, नांदलापूर, कोयना वसाहत परिसरातील लोकांना वेगवेगळे जातीचे, जन्माचे, मृत्यूचे दाखले देण्यात आले. रेशनिंग कार्ड, आमआदमी विमा वाटप, राष्ट्रीय कुटुंब योजना धनादेश, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक खाते अशा विविध प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले. पंचाचत समिती कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस विभाग, पशुवैद्यकीय विभाग वनविभाग आदींनी आपापल्या विभागाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविली.कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी, अविनाश फडतरे, नायब तहसीलदार मिनल भोसले, उपअभियंता व्ही. व्ही. साखरे, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल, सरपंच नरेंद्र नांगर-पाटील, पंचायत समिती सदस्या पुष्पा पाटील, मंडलाधिकारी नागेश निकम, उपसरपंच महेश गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष रामदादा पाटील, पांडुरंग पाटील, तानाजी कणसे, ग्रामविकास अधिकारी एन. डी. लोहार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)खाद्य पदार्थांची मेजवानीमहिला व बालकल्याण विभागाने विविध खाद्यपदार्थ बनविल्याचा स्टॉल लावला होता. जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी या स्टॉल्सना भेटी दिल्या. खाद्य पदार्थांची चव चाखण्याचा मोह अधिकाऱ्यांना आवरता आला नाही. एक दिवस मजुरासाठी शासनाच्या वतीने एक दिवस मजुरासोबत उपक्रम राबविण्यात येतो, तो उपक्रम आज जखिणवाडीत राबविण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी जखिणवाडी शिवारात २०० मजुरांसोबत पूर्ण दिवस घालविला.