शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

हजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 19:25 IST

‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला.

ठळक मुद्देक-हाडच्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी झटले हजारो हात

क-हाड : स्वच्छ अन् सुंदर अशा कºहाड शहर व कृष्णा नदीपात्रास महापुराचा फटका बसला होता. पुरामुळे कृष्णाघाटास कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. यावर उपाय शोधत गत आठ दिवसांपासून क-हाड शहर स्वच्छतेत झटलेले हजारो हात ‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला.

क-हाड येथील कृष्णा-कोयना नद्यांचा संगम लाभलेल्या प्रीतिसंगमस्थळी मंगळवारी कºहाड पालिकेच्या वतीने कृष्णा नदीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी, पंधराहून अधिक सामाजिक संस्था, हजारहून अधिक कºहाडकर नागरिक, लोकप्रतिनिधींनी सहभागी होत तीन तास स्वच्छता केली. यावेळी महापुरातील पाण्यातून वाहून आलेल्या गोधडी, झाडेझुडपे, कपडे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या या नदीपात्रातील झाडे, झुडपांमध्ये अडकले होते. ते एकत्रित करीत पालिकेच्या कचरा गाडीत टाकले. सुमारे चार तास केलेल्या स्वच्छतेनंतर कृष्णा नदीकाठ चकाचक दिसू लागला आहे.

कृष्णा नदीत केलेल्या महास्वच्छता अभियानात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नोडल आॅफिसर आर. डी. भालदार, अभियंंता ए. आर. पवार, नगरसेवक विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, विद्या पावसकर, सदाशिव यादव, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, सुहास जगताप, प्रीतम यादव, एनव्हायरो नेचर फें्रडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होत नदीकाठची स्वच्छता केली.- चौकटआरोग्यासाठी हँडग्लोज अन् मास्कचे वाटपकºहाड येथील कृष्णा नदीकाठी पसरलेल्या दुर्गंधीतून कोणताही आजार उद्भवू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. सामाजिक संस्था व पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिक, महाविद्यालयीन युवक, कर्मचाऱ्यांना हँडग्लोज व मास्कही देण्यात आले.- चौकट :चिंध्यांपासून ते गोधडीपर्यंत सोळा टन कचरा...कºहाड पालिकेच्या वतीने मंगळवारी करण्यात आलेल्या कृष्णा नदीकाठावरील महास्वच्छता अभियानातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला. त्यामध्ये नदीस आलेल्या महापुरातून वाहून आलेले व झाडाझुडपांत अडकलेल्या प्लास्टिक पिशव्या, चिंध्या, गोधडी यासह निर्माल्य, जलपर्णी असा सुमारे सोळा टन इतका कचरा, निर्माल्य पालिकेने कचरा गाडी, ट्रॅक्टरमधून घेऊन जाऊन वीज निर्मिती व खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी ठेवला.- चौकट‘चला... कृष्णा वाचवूया’चा संदेशकºहाड शहराच्या स्वच्छतेबरोबरच कृष्णा नदीपात्राची स्वच्छताही करणे गरजेचे असल्याने विविध संस्थांतील सदस्य, नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या स्वच्छता अभियानात हजारो कºहाडकर व विद्यार्थ्यांनी सहभागी होत नदीकाठी स्वच्छता केली. यावेळी दिसेल तो कचरा उचलत नदीकाठ स्वच्छ केला या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी ‘चला.. कृष्णा वाचवूया,’ असा संदेश दिला.- कोटकºहाड शहर स्वच्छतेप्रमाणे नदीस्वच्छतेची जबाबदारी सर्वांची आहे. महापुरामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. तो आता महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हटविला आहे. यामध्ये कºहाडकरांनी मोलाचे सहकार्य केले आहे.- यशवंत डांगेमुख्याधिकारी, कºहाड पालिका- चौकटचार तासांत नदीकाठ चकाचक़..सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात आलेले कृष्णा नदीपात्रातील महास्वच्छता अभियान हे सुमारे साडेअकरा वाजेपर्यंत म्हणजे चार तास चालले. यावेळी कृष्णा नदीघाटापासून ते स्मशानभूमी परिसरापर्यंतचा परिसर नागरिक, विद्यार्थी, युवक, कर्मचाºयांनी एकत्रितपणे येऊन चकाचक केला.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूर