शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

By प्रमोद सुकरे | Updated: January 6, 2023 17:23 IST

देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे.

प्रमोद सुकरेकराड : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील एक महत्वाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम राबविण्याच्या उद्देशाने बदलण्यात आलेल्या या नामकरणास, भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.दिवंगत जयवंतराव भोसले यांनी  १९८४ साली कराड येथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स’ संस्थेची स्थापना केली. आरोग्य विज्ञानात झपाट्याने होत जाणारे बदल लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने, भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २४ मे २००५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या शिक्षण संस्थेला ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड युनिव्हर्सिटी’ म्हणजेच अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू केली. सुमारे ५८ एकरच्या विस्तीर्ण जागेत वैद्यकीय शिक्षणासह नर्सिंग, दंतविज्ञान, फिजिओथेरपी, अलाईड सायन्स व फार्मसी अशा विद्याशाखा सुरु करत, विविध अभ्यासक्रम सुरु केले. या विद्यापीठात हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.झपाट्याने बदलणारे शिक्षणक्षेत्र, वाढत्या शैक्षणिक गरजा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यापीठाचे नाव बदलून कृष्णा विश्व विद्यापीठ करण्याचा निर्णय घेतला असून, याठिकाणी आता कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यानुसार आता कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी हे नाव बदलून ‘कृष्णा विश्व विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी)’ हे नवे नामकरण करण्यात आले असून, अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता कायम आहे.कृष्णा विद्यापीठाला यापूर्वीच 'नॅक'चे 'ए प्लस' श्रेणीतील मानांकन आणि 'आयएसओ ९००१ : २०१५' मानांकन प्राप्त झाले आहे. भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन २०२२ साली देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरuniversityविद्यापीठMedicalवैद्यकीय