सन १९८९ पासून सत्तांतराचे लागलेले ग्रहण सभासदांच्या हिताचे नाही. यामध्ये कृष्णेच्या विकासाच्या अपेक्षेने केलेले बदल पाहता, काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी सभासदांचे हित पाहिले. यामध्ये पाणीपुरवठा योजना महत्त्वाच्या आहेत. निवडणुका सत्ता आणि राजकारण यांची सांगड घालून झाल्या पाहिजेत. यातूनच ‘कृष्णा’ची प्रगती होण्यासाठी सभासदांनी केलेले सत्तांतर फायद्याचे ठरेल.
- भगवानराव पाटील,
माजी नगराध्यक्ष, इस्लामपूर