कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील कृषीसंगम संस्थेच्या भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कृषीसंगमचे तज्ज्ञ संचालक एल. के. पाटील, संभाजी चव्हाण, हणमंत चव्हाण, जयंत पाटील, गणेश चव्हाण उपस्थित होते.
प्रिया पाटील म्हणाल्या, ‘कॉपशॉप’ची निर्मितीच शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या फायद्यासाठी झाली आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून ‘कॉपशाॉप’ चालते. यामध्ये शेतकरी स्वत: आपल्या मालाची किंमत ठरवू शकतो. गत काही महिन्यांपासून कृषीसंगमच्या माध्यमातून कॉपशॉपला उत्तम दर्जाचा तांदूळ, शेंगदाणे, गूळ पावडर व परिसरात उत्पादित केला जाणारा माल पुरवला जात आहे. ‘कॉपशॉप’चा शेतकरी व ग्राहक दोघांना फायदा होणार आहे. कृषीसंगम संस्थेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त शेतकरी, बचत गट, शेतकरी गटांनी एकत्रित येऊन उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ व इतर माल कॉपशॉपला पाठवावा. कृषीसंगमचे काम स्तुत्य असून, संस्थेचे काम शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल.
फोटो : ०९केआरडी०४
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे कृषीसंगम संस्थेला सहकार विकास महामंडळ ‘कॉपशॉप’च्या मुख्य अधिकारी प्रिया पाटील यांनी भेट दिली. यावेळी संभाजी चव्हाण, हणमंत चव्हाण, जयंत पाटील, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.