सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेतामध्ये कोणी गांजा लावला असेल अथवा पूजेची लागण केली असेल, तर कोतवाल संबंधित शेतकऱ्याची नाराजी पत्करून शासनाकडे तक्रार करतात. गावातील शिवार फिरत असताना कोतवालांच्या चपला फाटतात. शासन मात्र वर्षाकाठी दहा रुपये इतका चप्पल खरेदी भत्ता त्यांना देते.
महागाई आकाशाला गवसणी घालत असताना, कोतवालांना मिळणारा चप्पल भत्ता केवळ १० रुपये आहे. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर हा चप्पल भत्तादेखील बंद झालेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या या कोतवालांची शासनाने चेष्टा केली आहे.
दहा रुपयांमध्ये चप्पल विकतही मिळत नाही आणि वर्षभरात जर दुरुस्तीचा खर्च विचार केला, तर तो १० रुपयात कसा करायचा, हा प्रश्न आहे. चार-पाचशे वर्षांपूर्वीचा चकली चादर आधुनिक काळातही लावला जातोय, हेच आश्चर्य आहे..
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.