शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाववासियांना आता २४ तास वीज

By admin | Updated: June 16, 2017 14:07 IST

समस्येतून सुटका : सातारारोड ऐवजी आता कोरेगाव उपकेंद्रातून पुरवठा

आॅनलाईन लोकमतकोरेगाव , दि. १७ : कोरेगाव शहरातील सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण कंपनीने जालीम उपाय शोधून काढला आहे. शहरालगत औद्योगिक वसाहतीत असलेल्या उपकेंद्रातून कोरेगाव शहराला वीज पुरवठा केला जाणार आहे. सातारारोड उपकेंद्राऐवजी कोरेगावातूनच शहराला वीज पुरवठा होणार असल्याने तो अखंडीत राहणार आहे.महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय साळे व कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्या विशेष प्रयत्नामुळे आणि आमदार शशिकांत शिंंदे यांच्या सहकायार्तून कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये मोठी क्षमता असलेला ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून, त्यावरुन शहराला वीजपुरवठा करण्याचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी उपकार्यकारी अभियंता अभिजीत महामुनी व शहर शाखेचे सहाय्यक अभियंता संतोष तळपे यांच्या हस्ते झाला.

शहराची लोकसंख्या मोठी असून, सुमारे साडेपाच हजार वीज ग्राहक आहेत. यापूर्वी असलेल्या मॅफको कंपनीमुळे सातारारोड उपकेंद्रातून कंपनीला आणि शहराला वीज पुरवठा केला जात होता. या वीज वाहिनीवर सातारारोड हे गाव देखील होते, तसेच जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्यावरुन वीज वाहिनी गेली असल्याने पावसाळ्यात आणि विशेषत वळिव पावसात कोरेगाव शहरातील वीज पुरवठा सातत्याने बंद राहत होता. अगोदरच अपुरे कर्मचारी आणि वाढते वीज ग्राहक यामुळे कर्मचाऱ्यांना तारेवरील कसरत करत देखभाल व दुरुस्तीची कामे करावी लागत होती.

कोरेगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता म्हणून अभिजीत महामुनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील वीज पुरवठ्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा प्रस्तावाचा पाठपुरावा केला. आमदार शशिकांत शिंंदे यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी समन्वय ठेवत, त्यासाठी निधीची तरतूद देखील करुन घेतली होती. गेली दोन महिने सातारारोड ऐवजी कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रातून शहराला वीज पुरवठा करण्याच्या वीज वाहिन्यांचे काम सुरु होते. गेली चार दिवस प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली. अभिजीत महामुनी व संतोष तळपे यांनी वीज पुरवठ्याचा प्रारंभ केला.

मोठी समस्या सोडविण्यात यश

कोरेगावात पदभार स्वीकारल्यानंतर समोर असलेली मोठी समस्या सोडविण्याचे भाग्य लाभले आहे. शहरवासियांना आता २४ तास अखंडीत वीज पुरवठा होणार आहे. नजिकच्या काळात वीज वाहिनी मजबुतीकरणाचे काम सुरु राहणार आहे, त्यामुळे काही काळासाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. विशेषत मंगळवारी दुरुस्तीचे काम केले जाईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे.- अभिजीत महामुनी,

उपकार्यकारी अभियंता, कोरेगाव.