किरपे (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर, विद्याधर देवकर, ढेबेवाडीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील, जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य अभिजित पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदुराव पाटील म्हणाले, गटतट विसरुन ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकजूट दाखवावी. ग्रामस्थांच्या एकीतून गावाचा कायापालट होऊ शकतो. किरपे हे गाव कर्तृत्वाची पाठराखण करते. त्यामुळे या गावाला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून या गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडाव्यात, प्रस्ताव तयार करावेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मानसिंगराव देवकर, समन्वय समितीचे अध्यक्ष कृष्णराव माने, मानसिंगराव देवकर, मारुती देवकर, बाबासाहेब देवकर, विकास देवकर, तानाजी देवकर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.