शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राजे प्रतापगडावरून उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:21 IST

सातारनामासचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साताऱ्याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांत दादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इथंच नव्या भविष्याची पेरणी झाली. फक्त गनिमाचा उलगडा झाला नाही... कारण ‘आपला गनीम नेमका कोण?’ याचा पत्ता जिथं ...

सातारनामासचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साताऱ्याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांत दादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इथंच नव्या भविष्याची पेरणी झाली. फक्त गनिमाचा उलगडा झाला नाही... कारण ‘आपला गनीम नेमका कोण?’ याचा पत्ता जिथं थोरल्या राजेंनाच अद्याप लागला नाही, तिथं बिच्चाºया सातारकरांना कुठून थांगपत्ता लागावा ?गिरीश पंतांचे फ्लेक्सम्हणे राजे लावायचे..शनिवारी सायंकाळी सर्किट हाऊसच्या पोर्चमध्ये कच्कन गाड्या थांबल्या. एका अलिशान गाडीतून चंद्रकांत दादा अन् गिरीशपंत खाली उतरले. पायºया चढून आत येताना ‘युन्नूस’ नामक सातारी मावळ्यानं त्यांच्या कानात थोरल्या राजेंचा निरोप पोहोचविला, ‘महाराज तुम्हाला भेटू इच्छितात, समोरच्या प्रतापगड सूटमध्ये थांबलेत,’ यावर दादांनी सहेतूकपणे पंतांकडं बघितलं. पंतांनी केवळ ‘बरंऽऽ बरंऽऽ’ म्हणत आपल्या ‘अजिंक्यतारा’ सूटकडे मोर्चा वळविला. बिच्चारा मावळा रिकाम्या हाती राजेंकडे गेला. काही वेळानं तोच निरोप घेऊन पुन्हा आला. यावेळीही दादा-पंत जोडी पुन्हा एकदा ‘बघूऽऽ बघूऽऽ’ म्हणतच कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारण्यात रमून गेली.राजेंचा संदेश प्राप्त होऊनही शेजारच्या ‘प्रतापगड’मध्ये न जाण्यात या दोन मंत्र्यांचा ‘प्रोटोकॉल’ आडवा येत होता की गेल्या चार वर्षांतली सत्तेची ऊब हलू देत नव्हती, माहीत नाही. मात्र, तिकडं चाणाक्ष राजेंनी पटकन् निर्णय घेतला. ‘तहाला जाताना युद्धाचा आवेश आणायचा नसतो,’ ही चाणक्य निती अवलंबून ते स्वत: या दोघांना भेटण्यासाठी बाहेर पडले. ‘प्रतापगड’मधून ‘अजिंक्यतारा’ सूटमध्ये प्रवेशले.राजेंना बघताच काहीजण दचकले. काहीजण आनंदले. आश्चर्य मात्र कुणालाच वाटलं नाही. ‘हे कधी ना कधी तरी घडणारच होतं,’ असाच अविर्भाव प्रत्येकाच्या चेहºयावर. अशीच खूणगाठ प्रत्येकाच्या मनात. ‘गिरीश पंतांशी माझी खूप जुनी ओळख. ते पुण्यात नगरसेवक असताना त्यांचे फ्लेक्स आम्ही तरुणपणी लावायचो,’ ही कॉलेजमधली जुनी आठवण सांगून राजे आतमध्ये गेले. अ‍ॅन्टी चेंबरमध्ये मुख्य खुर्चीवर बसलेले गिरीश पंत समोर राजेंना पाहताच उठून उभे राहिले, ‘तुम्ही या खुर्चीवर बसा. नाहीतर पेशव्यांसमोर राजे बसले, अशी पुन्हा बातमी व्हायची,’ अशी मिश्किली करत पंतांनी त्यांना मुख्य खुर्चीवर बसविलं.खासगीत उदो-उदो..... सर्वांसमक्ष दुर्लक्ष !स्वत:ला ‘पेशवे’ म्हणवून घेत गिरीश पंतांनी ‘राजें’ना मुख्य खुर्चीवर बसविलं खरं.. परंतु, सुरुवातीला त्यांच्या निरोपानंतरही त्यांना भेटायला मात्र गेले नव्हते. ‘खासगीत उदो-उदो... सर्वांसमक्ष दुर्लक्ष,’ ही गिरीश पंतांची ‘पेशवे निती’ साताºयाच्या राजेंसाठी नवी असली तरी थोरले काका बारामतीकरांच्या दरबारातील मनसबदारांकडून हाच अनुभव त्यांना आजपावेतो पदोपदी आलेला. त्यामुळं ‘पार्टी’ बदलली तरी ‘सत्तेची नशा’ तीच असते, हे ओळखण्याइतपत राजेंचे सल्लागार राजकारणात नक्कीच नवखे नसावेत.रायगडाकडे पाठ.... अजिंक्यताºयाची वाट !सर्किट हाऊसमधील ‘प्रतापगड’ हा सूट काही नेत्यांचा अत्यंत आवडता. सातारी मुक्कामी अनेकांचा ठिय्या याच दालनात. याला पाठीमागूनही ये-जा करण्याची सोय असल्यानं इथं कधी आलं अन् कधी गेलं, कुणालाच समजत नाही म्हणे ( ! ). आता ‘असं का?’ हा भाबडा प्रश्न कुण्या सरळसोट सातारकरानं विचारू नये म्हणजे मिळविली.असो, याच सर्किट हाऊसमधील शेजारचा ‘अजिंक्यतारा’ सूट हा फलटणच्या राजेंचा आवडता. त्यांचा मुक्कामही नेहमी याच दालनात. त्यामुळं फलटणचे राजे ‘अजिंक्यतारा’मध्ये असताना तिकडं ढुंकूनही न बघणारे साताºयाचे थोरले राजे जेव्हा पंत अन् दादांना भेटायला स्वत:हून या दालनात आले, तेव्हाच आगामी लोकसभेतल्या बदलत्या भविष्याची नांदी उपस्थितांना कळून चुकली.काळसुद्धा किती जबरी असतो पाहा. गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी रायगडावर ‘कमळ’वाल्यांचा भलामोठ्ठा सोहळा रंगलेला. ‘मोदीं’च्या या ‘इव्हेंट’ला साताºयाचे राजेही जाणार म्हणून गावोगावी त्यांच्या फोटोचे फ्लेक्स झळकलेले. मात्र, शेवटच्या क्षणी अनेक ‘कमळ’वाल्या नेत्यांच्या विनवणीला भीक न घालता राजे रायगडाकडं पाठ करून बसलेले. आज हेच राजे आपला ‘प्रतापगड’ सोडून गनिमाच्या ‘अजिंक्यतारा’वर स्वत:हून दादा-पंतांना भेटायला आलेले. यालाच म्हणतात.. काळाचा महिमा अन् सत्तेचा चमत्कार... अजून दुसरं काय?दादांकडून घड्याळाची तरराजेंकडून कमळाची चाचपणी !‘अ‍ॅन्टी चेंबर’मध्ये राजे, पंत अन् दादा जवळपास अर्धा तास बोलत बसलेले. ‘साताºयाचं हवापाणी’ या विषयावर तर नक्कीच इतका वेळ चर्चा नव्हती. मात्र, जी काही झाली, ती एकमेकांना चाचपडण्याचीच... ‘राजेंनी कमळ हाती घेतलं तर बारामतीकरांचे किती बुरुज उद्ध्वस्त होतील. त्यांचे इथले किती सरदार कामाला लागतील?’ याचा शोध म्हणे पंत अन् दादा समोरच्या राजेंकडून घेत होते... तर ‘भविष्यात कमळ शंभर टक्के फुलणार काय?’ याचा अंदाज म्हणे राजे या दोघांच्या बोलण्यातून बांधत होते.‘राजेंचा बॉम्ब आपण टाकला तर जिल्हाभर कसा धुरळा उडेल ?’ याचं समीकरण हे दोघे जुळवत होते.. तर ‘बॉम्ब न फोडता केवळ कमळाचं फूल दाखवून आपल्या लाडक्या मित्राला कसं बेजार करता येईल ?’ याचं गणित म्हणे राजे बांधत होते... कारण अजितदादा रविवारपासून दोन दिवस सातारी मुक्कामी आहेतना रावऽऽ’