सातारा : येथील एका शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार तिच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मुलगी सतरा वर्षांची असून तिला शुक्रवार, दि. २६ रोजी कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. हे लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने त्याचदिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईने एका मुलानेच माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस त्या मुलाकडून अधिक माहिती घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार काशीद हे करीत आहेत.