शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

खंडाळ्यात लोकसभेची साखरपेरणी ! : रामराजे, बकाजीराव पाटील यांची कमराबंद चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:52 IST

खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत.

दशरथ ननावरे ।खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत. अलीकडच्या काळात पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला नाही. राष्ट्रवादीच्या सध्याच्या धोरणावर नाराज असलेल्या पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पारगाव येथे त्यांच्या निवासस्थानी अचानक भेट घेत सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. यामागे बकाजी आबांची नाराजी दूर करून लोकसभेसाठी चाचपणी असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी पक्षांतर्गत गटबाजीने हैराण झालेल्या ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांनी गत काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक बैठकींपासून फारकत घेतली आहे. परंतु गावोगावी आपल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका घेत आपली संपर्काची घडी कायम ठेवली आहे. दरम्यान, या त्यांच्या कार्यास नव्या जुन्या मंडळीनी चांगलाच हात दिला आहे.

गत दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहू लागले आहे. अंतर्गत असणारी नव्या जुन्यांची गटबाजी चव्हाट्यावर आल्याने नाराजीचा महापूर वाहू लागला आहे. याचा फुगवटा वाढतच चालला आहे. परंतु या नाराजीला अटकाव घालण्यास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला यश आलेले दिसत नाही किंवा तसा प्रयत्नही झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बकाजी आबांनी पक्षाविरोधी उघड बंड केले होते. तेव्हापासून नाराजी सत्र चालूच असून, गतवर्षीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या स्थानिक बैठकीला रामराम केला होता. परंतु सवतासुभा मांडण्याचे धाडस केले नाही.

अलीकडच्या काही महिन्यांपासून नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे-पाटील यांच्यासह इतर नाराज मंडळींशी वाढवलेली सलगी व जनमानसात बैठकांचा सुरू केलेला धडाका यामुळे नव्या राजकीय समीकरणांची नांदी निर्माण होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. अशातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बकाजीराव पाटील व माजी सभापती रमेश धायगुडे यांच्याशी अचानक भेट घेऊन कमराबंद चर्चा केली.

तालुक्यात घडत असलेल्या व आगामी काळात घडणाऱ्या राजकीय गोष्टींचा उहापोहाची चर्चा आहे. परंतु रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बकाजीराव पाटील व माजी सभापती यांच्या भेटीने जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लोकसभेची साखरपेरणी असल्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.अचानक भेटीमुळे जनतेत तर्क-वितर्कज्येष्ठ नेतृत्वाला अचानक भेटीने दिलेला आधार नाराजी थोपवणार का? बकाजीराव पाटील राष्ट्रवादीच्या बैठकीत पुन्हा सक्रिय होणार का? याविषयी जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेणार? याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्याशी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व रमेश धायगुडे यांनी कमराबंद चर्चा केली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण