शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

किल्ली पोटात... चिंचोका नाकात अन् पेन्सिल कानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

सातारा : मुलं वाढवणं वाटतंय तेवढं खरंच सोपे राहिलेले नाही. खेळ सुरू असताना किल्ली गिळणे, चिंचोका नाकात घालणे आणि ...

सातारा : मुलं वाढवणं वाटतंय तेवढं खरंच सोपे राहिलेले नाही. खेळ सुरू असताना किल्ली गिळणे, चिंचोका नाकात घालणे आणि पेन्सिल कानात घालण्याचे प्रकार बालकांच्यात पाहायला मिळतात. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ अशी अवस्था होत असल्याने या बाललीला कुटुंबियांची अक्षरश: भंबेरी उडवत आहेत.

वाढत्या वयात मुलांच्या लीला बघण्यात कुटुंबीय व्यस्त असतात; पण त्यांची एखादी कृती अवघ्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे घरात रांगणारं बाळ असेल तेव्हा हाताला येतील अशा वस्तू न ठेवणं आणि त्याच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देणं आवश्यक असते. खेळता-खेळता खिळा, सेल, नाणे, सेप्टी पीन गिळल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग यासाठी वरदायी ठरते. विनाशस्त्रक्रिया एण्डोस्कोपीच्या मदतीने यशस्वी आणि कमी त्रासाचे उपचार होतात. अमुक करो नको, असं पालक लहानग्यांना सांगतात, म्हणूनही मुलं करून बघतात आणि असे अपघात होतात, असे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

१. मुलं काय करतील त्याचा नेम नाही

नाकात चिंचोका, वाटाणा आणि शेंगदाणा घालणं हे मुलांचे आवडीचे प्रकार आढळतात. त्यांच्या आकारामुळे नाकपुडीत ते गेले की पुन्हा हाताने काढायचा प्रयत्न केला तरीही ते अडकून बसते.

बाळ झोपलं म्हणून आईने कपाट आवरायला घेतलं. कपाटाच्या लॉकरची अगदी छोटीशी चावी अनावधानाने बेडवरच राहिली. बाळ उठल्यावर त्याने हातात किल्ली घेतली आणि आई त्याकडे बघेपर्यंत चक्क ती किल्ली गिळली गेली. एक्सरेमध्ये ही किल्ली स्पष्ट दिसली. त्यानंतर पुढे चार दिवस बाळाच्या शी तून किल्ली बाहेर पडतेय का हे पाहण्यासाठी अख्खं कुटुंब जुंपले होते.

२. रडणारी बाळं हेच मोठं आव्हान

सहा महिन्यांपासून अगदी तीन वर्षांपर्यंतची मुलं निव्वळ उत्सुकतेपोटीच वस्तू कान, नाक आणि तोंडात घालतात. अनेकदा सर्दी असल्याने मुलं नाकात बोटं घालत असतात. त्याचवेळी त्यांच्या हातात जर छोटी वस्तू असेल तर ती नाकात अडकून बसते. त्यानंतर ते दुखायला लागलं की बाळ रडायला लागतं. लाख प्रयत्न करूनही बाळ शांत होत नाही म्हणून पालक रुग्णालयात येतात. त्यानंतर रडणारी ही बाळं तपासणं, त्यांना कुठं हात लागला, ते ओरडतात याची तपासणी करावी लागते. बोलायला येणारी बाळं बरी, पण बाेलता न येणाऱ्या बाळांचे निदान करणं हे आव्हान असते.

३. अशी घ्या मुलांची काळजी

खेळताना होणारे अपघात हे मुलांच्या औत्सुक्यामुळे होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुलांच्या मनातील शंका निरसन करणं आवश्यक आहे. बसायला आणि रांगायला लागलेल्या बाळांना गरम वस्तूने चटका बसतो, हे कृतीतून शिकवणं महत्त्वाचं आहे. तान्ह्या बाळांसाठी तर निव्वळ बारीक लक्ष ठेवणं आणि त्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करणं हाच पर्याय उरतो.

४. कोट

लहान मुलांच्या करामती पालकांची झोप उडवतात. उत्सुकता म्हणून मुलांनी केलेले हे कृत्य त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचं आहे. नाकात काही अडकलं तर शिंक यावी म्हणून पालक तपकीर ओढायला लावतात. यामुळे नाकात अडकलेले श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी घरगुती उपाय करण्यापेक्षा थेट तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचे.

- डॉ. दीपक थोरात, बालरोगतज्ज्ञ