शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

विकासकामात आडकाठी आणाल तर याद राखा

By admin | Updated: January 14, 2015 23:40 IST

जयकुमार गोरे : विरोधकांना इशारा; महिमानगड, बिदाल येथे रस्ता कामाचा प्रारंभ

दहिवडी : लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत कोणत्याच विकास कामात राजकारण आणले नाही, मात्र विकासकामात विनाकरण कुणी आडकाठी आणत असेल तर याद राखा. शांत आहे. याचा कुणी गैरअर्थ काढू नका असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.महीमानगड येथे १३ व्या वित्तआयोगातुन ३० लाख आणि विशेष दुरूस्ती कार्यक्रमातुन ९ लाख अशा ३९ लाख रुपये खर्चाच्या महीमानगड, दिवडी, शिंदीबुद्रुक, बिदाल रस्ल्याच्या कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोमनाथ भोसले, दादासाहेब काळे, चांगदेव सुर्यवंशी, सरपंच विकास देवकर, लक्ष्मण जाधव, रत्नप्रकाश जोशी आदी उपस्थीत होते.आ. गोरे पुढे म्हणाले, महिमानगड, दिवडी, बिदाल या रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबीत आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकऱ्यांची अडचण ध्यानात घेवूनच काम मार्गी लावले आहे. विकासकामांशी देणे घेणे नसणारे विरोधक कामात आडकाठी आणायचा प्रयत्न करत आहेत. यापुढे दहशतीचे राजकारण चालु देणार नाही. शांत आहे याचा अर्थ गैरअर्थ काढण्याची चुक कुणी करु नये.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या आंधळी गण आणि गटातील मताधिक्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. यापुढेही जनतेने असेच सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिमानगडचा पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लावु असेही त्यांनी सांगितले. डॉ. रत्नप्रकाश जोशी, चांगदेव सुर्यवंशी, बाबु मुल्ला आदिंनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)