शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्याच घरात काठ्या अन् कुऱ्हाडी -उदयनराजे भोसले; एकसळ येथे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:01 IST

‘कोरेगाव तालुक्यातील पवारनिष्ठ स्वाभिमानी विचार मंचचे सदस्य एकत्र जो निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील.

ठळक मुद्देकोरेगाव मतदारसंघात दंडेलशाही चालू देणार नाही

कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्यातील पवारनिष्ठ स्वाभिमानी विचार मंचचे सदस्य एकत्र जो निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील. वाट्टेल त्या परिस्थितीत या मतदारसंघात दंडेलशाही चालू देणार नाही. एक लक्षात ठेवा, सर्वांच्याच घरात काठ्या आणि कुऱ्हाडी आहेत,’ अशा स्पष्ट शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता इशारा दिला.

राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याशी निष्ठावंत असलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी विचार मंचच्या माध्यमातून एकी केली आहे. एकसळ येथे अ‍ॅड. पी. सी. भोसले यांच्या माध्यमातून झालेल्या स्वाभिमानी विचार मंचच्या बैठकीस खा. उदयनराजेंनी हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये चांगलीच टीका टिप्पणी केली. यावेळी सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, शहाजी क्षीरसागर, नानासाहेब भिलारे, अजय कदम, अ‍ॅड. विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, कोरेगावचे उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, ‘२० वर्षे कशी गेली, माहीत नाही. आपण माझ्यावर प्रेम केले. प्रेम आणि नाते मनापासून जुळले पाहिजे. प्रेम काय पुस्तकात गोष्टी वाचून होत नाही. तुम्ही सर्वांनी जे ठरवाल ते ठरवा, सर्व ठिकाणी मी... मी.... कशासाठी, काय घडले जावळीत. त्याचे पडसाद उमटायचे ते उमटले. ज्यावेळी काम काढायची वेळ येईल, त्यावेळी काम काढणार. प्रतिनिधित्व आपल्याकडे असताना सामान्य जनतेचा विसर पडला नाही पाहिजे.

तुम्ही मला दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.’ ‘कोरेगावात काही कमी नाही. कोरेगावची खंत वाटते की ते कधीही एकत्र येत नाहीत. ऐनवेळेस कोण कोठे जाईल, हा तुमचा प्रश्न. तुम्ही निर्णय घेतला तर तो एकासाठी लागू होत नाही. पक्षात वरिष्ठ आहेत, ते पाहत आहेत,’ असेही खा. उदयनराजेंनी स्पष्ट केले.नेतृत्व बदलण्याची मागणी करणार...या कार्यक्रमात सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, अजय कदम, अनिल बोधे, नानासाहेब भिलारे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत, पक्ष नेतृत्वाकडे आपण मतदारसंघातील नेतृत्व बदलण्याची मागणी करू या. वेळप्रसंगी चिठ्ठी टाकू, सामान्य उमेदवार असला तरी त्याच्या पाठीशी राहू, असा निर्धार यावेळी करण्यात आला.एकसळ, ता. कोरेगाव येथे खा. उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठलराव कदम, अनिल बोधे, शहाजी क्षीरसागर, सुनील खत्री, जयवंत पवार, अ‍ॅड. पी. सी. भोसले, अ‍ॅड. विजयसिंह शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण