शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कासची उंची वाढली, पण यांच्या विचारांची कधी वाढणार; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:20 IST

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आही की, आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. 

सातारा : कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार, याचे सातारकरांना कुतूहल आहे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आही की, आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. 

सार्वजनिक कामात बाप दाखवा नाहीतर श्राद्ध कर अथवा एक घाव दोन तुकडे करण्याची भूमिका घेण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. लोकहित लक्षात घेऊन आम्ही एखादा प्रश्न घेऊन कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहिती दिली तर त्यात वावगं काहीच नाही. ते कधी सार्वजनिक प्रश्न घेऊन कोणाकडे जात नसतील आणि जरी गेले तरी त्यात स्वार्थाचा मथितार्थ अधिक असेल तसेच त्यांना कोणी मंत्रिमहोदय भेटीसाठी कदाचित उभं करत नसतील. उदयनराजेंना कोणताही मंत्री कसा इतका वेळ देतो, मला तसा वेळ कोणीच का देत नाही, अशी सल त्यांना बोचत आहे. त्यांनी आमच्या असूयेपोटीच गरळ ओकलेली आहे. त्याला फार महत्त्व देत नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

महोदय, भ्रष्टाचार आणि स्वार्थांध विचाराने बरबटलेल्यांनी भ्रष्टाचाराबाबत आरोप करणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल. बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. बँकांतील घामाचा पैसा मागण्यासाठी यांच्या घरासमोर याचना करणाऱ्या व्यक्तींना, समस्त सातारकरांनी पाहिलेले आहे. यांनीच प्रचंड प्रमाणात आणि सगळीकडे जबर भ्रष्टाचार केला आहे. कावीळ झाली की सर्व जग जसे पिवळे दिसते, तसे सगळेच भ्रष्टाचार करतात असे त्यांना वाटत असावे. त्यांच्या या विफलांगतेची कीव वाटते, असेही उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले