शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

Satara News: बावधनात ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर; ऐतिहासिक, पारंपरिक बगाड सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 16:51 IST

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थिती पार पडली

तानाजी कचरेबावधन : साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या गजरात उत्साहात पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाड्या दिलीप दाभाडे यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजतगाजत बगाडाजवळ नेण्यात येऊन त्याला पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. सकाळी साडेअकरा नंतर बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली.ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाड ओढणाऱ्या बैलजोड्या बदलण्यात आल्या. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि जोतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोहोचले. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला.  गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. रात्री उशिरा बगाड गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.

ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाबागाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाड्याच्या पुढे व पाठीमागे ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. अनेक भाविकांनी दिलेल्या देगण्यांचा पुकारा यावेळी करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

गाडा ओढण्यासाठी धष्टपुष्ट बैल...

  • बगाड रथाला शेतातून जाताना एका वेळी १२ बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर चार बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. 
  • ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते, यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देऊन तयार केले होते. 
  • हे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लोक लांबून येत असतात. 
  • दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बगाड गाडा ओढणाऱ्या या धष्टपुष्ट बैलांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. 

प्रशासनाचे नेटके नियोजन...बगाड परिसरात विविध संस्था तसेच मंडळांनी भाविकांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. वाई पालिकेचा अग्निशमन बंब, महावितरण विभागाने कर्मचारी रथ मार्गावर तळ ठोकून होते. याशिवाय वाई पोलिसांच्या पथकासह, एक जलद कृतिदलाची तुकडी तैनात होती. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी देखील बगाड यात्रेला भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर