शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कास पुष्प पठार पर्यटकांबरोबर फुलांनी सजले!, कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

By दीपक शिंदे | Updated: September 18, 2024 18:47 IST

तलाव हाऊसफुल्ल..!

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरपर्यटनासाठी राज्यासह देश - विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून, राजमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली असून, शनिवार, रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटक कासच्या फुलोत्सवचा आनंद लुटत आहेत.विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान, कास - महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी अनुभवताना दिसत आहेत.

पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाइड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

तलाव हाऊसफुल्ल..!कास पठारावर परदेशी पाहुणेदेखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. परदेशी पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत देश - विदेशातील बहुसंख्य पर्यटकांची पावले राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.

कास पुष्प पठारावरील साडेतीनशेच्या आसपास दुर्मीळ प्रजाती वर्षभर येतात. अनेकविध प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू असून, चांगले फ्लॉवरिंग आहे. सध्या फ्लॉवरिंगसाठी वातावरणही पोषक आहे. -सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन