शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

कऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:48 IST

वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देकऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलनप्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार निवेदने

कऱ्हाड : वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार निवेदने देऊनही शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे गुरूवारपासून कऱ्हाड  तहसीलदार कार्यालयासमोर दशरथ पवार यांच्यासह काकासाहेब चव्हाण, सूर्यकांत पवार, दिपक नलवडे, जयवंत पवार, प्रकाश पवार, दिपक जाधव, राजू चव्हाण, प्रसाद धोत्रे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आंदोलन पाच दिवस सुरू असूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जलआंदोलन सुरू केले. दशरथ पवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडार समाजावर होत असणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी २०१७ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कऱ्हाड तहसीलदारांच्याकडे पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु कऱ्हाड तहसीलदार कार्यालयाने पाठपुराव्याशी असंबंधित लोकांना खाणपट्टा कब्जा देऊन उत्खनन सुरू केले आहे. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही नेमकी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्या मागणीनुसार नांदलापूर, केसे, पाडळी येथे ७ मार्च २०१५ च्या अनुषंगाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, दंडात्मक कारवाई रद्द व्हावी तसेच पाठपुराव्याशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.दरम्यान, आंदोलन सुरू असताना पोलीस तेथे आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून बाहेर येण्याची विनंती करत होते. परंतु, तीन तासांनंतरही ते बाहेर आले नाहीत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर