शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

कऱ्हाड -- ३,७५४ शाळांमध्ये ‘मोदींचा इव्हेंट’

By admin | Updated: September 5, 2014 23:27 IST

शिक्षक दिन : इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे पंतप्रधानांचे ऐकले विद्यार्थ्यांनी भाषण

कऱ्हाड : ‘मुलांनो ! जास्तवेळ टीव्ही़ पाहू नका, अभ्यास भरपूर करा, होमवर्क पूर्ण करून आणा...’ अशा ढिगभर सूचना देणाऱ्या शिक्षकांनी आज शाळेत चक्क ऊसना टीव्ही़ आणला. शेजारच्या डिशवरून तात्पुरते ‘कनेक्शन’ही जोडून घेतले़ कारण त्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तास मुलांना ऐकवायचा होता़ मोदींचे १५ मिनीटांचे भाषण ऐकून विद्यार्थी मात्र, खूष झाल्याचे पहावयाला मिळाले़ पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो़ यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व विद्यार्थ्यांना दाखवावे, असे आवाहन शाळांना करण्यात आले होते़ त्यावेळेपासून शालेय व्यवस्थापनाची धावपळ सुरू होती़ आजचं युग हे महिती तंत्रज्ञानाचं असलं तरी, संगणक संच बऱ्याच शाळेत पोहोचले असले तरी आजही अनेक शाळांत टीव्ही मात्र नाही़ मग काय, एरव्ही टीव्हीबघू नका असे विद्यार्थ्यांना सांगणारे शिक्षकच घरातला, शेजाऱ्याचा टीव्हीघेऊन आज शाळेत आले़ शेजाऱ्याची केबल अथवा डिश वरून कनेक्शनही त्यांनी जोडून घेतले़ दुपारी दोन वाजल्यापासूनच टीही ठेवलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांची ‘हाताची घडी अन तोंडावर बोट’ पहायला मिळाले़; पण शेवटी विद्यार्थी ते विद्यार्थीच त्यांची चूळबूळ सुरू झाली़ अन् सरतेशेवटी कार्यक्रम सुरू झाला़ सुरूवातीला टीव्हीवर छोट्या मुलांची छान भाषणंही विद्यार्थ्यांनी ऐकली नंतर नरेंद्र मोदींचे भाषणही ऐकले़ नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवादही सर्वांना भावला़ अन शेवटी मोदी सरांनी दिवसभरातून चार वेळा तरी विद्यार्थ्यांच्या अंगातून घाम आला पाहिजे, त्यासाठी भरपूर खेळा, असे सांगितलंय, हे त्यांनी आपल्या शिक्षकांना आवर्जून सांगितले ! (प्रतिनिधी)टीव्ही, रेडिओवरुनही प्रक्षेपण : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सक्रिय ---वीज गुल झाल्याने जनरेटरचा वापर---टीव्हीवरील धूळ झटकली...---पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शाळांनी विद्यार्थ्यांना ऐकवावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळांतील टीव्ही धूळखात पडून होते. पंतप्रधानांच्या या संदेशाच्या निमित्ताने ते टीव्ही दुरुस्त करण्यात आले किंवा त्यावरील धूळ झटकण्यात आली. काही शाळांनी नवीन टीव्ही, रेडिओ खरेदी केले. दालवडीत प्रोजेक्टरवाई : वाई तालुक्यातील दालवडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना भाषण चांगले एकता यावे, यासाठी प्रोजेक्टर लावला होता. टीव्हीत पाहून  वाजवल्या टाळ्यामोदी यांनी हिंदीतून भाषण केले. पहिली ते चौथीच्या मुलांना फारसे समजत नव्हते. त्यामुळे विडणी येथील शाळेतील मुले टिव्हीतील मुलांनी टाळ्या वाजविल्या की, तेही टाळ्या वाजत होते. फरांदवाडी शाळेत टीव्हीची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे अजित नाळे यांच्या घरात जाऊन टीव्हीवर मोदींचे विचार ऐकले. जिल्ह्यातील ३ हजार ७५४ शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकविण्यात आला. शंभर टक्के शाळांनी याला प्रतिसाद दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्याबरोबर आम्ही नागठाणे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. कोडोली येथेही भेट देऊन माहिती घेतली.प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिकसभागृह छोटी  -अडचण मोठी शहरातील अनेक शाळांत विद्यार्थी संख्या मोठी असल्याने टीव्हीची सोय करूनही सर्व विद्यार्थ्यांना भाषण दाखविता आले नाही़ मात्र, त्यावर उपाय म्हणून स्पिकरच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना भाषण ऐकविले, त्यामुळे विद्यार्थी खूष होते. काही विद्यार्थी रस्त्यावर काही शाळांमध्ये मोदींचे भाषण ऐकविण्याऐवजी विद्यालयाचाच शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू होता़ विद्यार्थी व शिक्षकांच्या मनोगतामध्येच सारे रममाण दिसत होते़ तर मोदिंचे भाषण सुरू असताना काही शाळांचे विद्यार्थी चालत घराकडे जात असल्याचेही पहायला मिळाले़ उपक्रमशिल शाळा म्हणून परिचित असणाऱ्या येथील नगरपरिषद शाळा क्रमांक तीनमध्ये मोदींच्या भाषणासाठी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे आवर्जुन उपस्थित होते़ मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी एका मित्राकडुन खास ४२ इंची एलसीडी, टीव्ही आणला होता़ त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषण नीट पाहता आले़ यावेळी अविनाश फडतरे यांनी सर्व शिक्षकांचा सत्कारही केला़ जी. श्रीकांत यांची नागठाणे शाळेला भेटनागठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना कितपत समजले हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी नागठाणे शाळेला भेट दिली. त्यांनी भाषन संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत हेच भाषन मराठी समजावून सांगितला. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोरडे यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.