शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

कऱ्हाडला दहा एकरात चारशे स्टॉल्स!

By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST

कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात : शासकीय ‘प्रतिकृतीं’ना आकार; मलकापुरातील कलाकारांच्या नव्वद प्रतिकृती

कऱ्हाड/मलकापूर : येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा मेळा भरतो. नवनवीन तंत्रज्ञानाचे व औजारांची माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनातून मिळते. शासकीय स्टॉल्सद्वारे नागरिकांचे प्रबोधन व शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जाते. यावर्षीचे प्रदर्शन हे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. दहा एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला व सुपरस्ट्रक्चर डोमपद्धतीने तयार करण्यात आलेला सभामंडपाचा शामियाना हा आकर्षक ठरणार असून, यात चारशे स्टॉल्समधून शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, चारशे स्टॉल्स अन् दहा एकरामध्ये हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनास केवळ दोनच दिवसांचा अवधी बाकी राहिल्याने या प्रदर्शनात कोयना वसाहतीमधील तीन कलाकारांनी बनविलेल्या नव्वद शासकीय स्टॉल्सच्या प्रतिकृती प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. चारशे स्टॉल्सपैकी शंभर स्टॉल्स हे शेतकऱ्यांसाठी मोफत देण्यात आले आहेत.कोयनावसाहतीमधील तीन हौशी कलाकारांनी पंधरा दिवसांत झोपडीपासून ते सॅटेलाईटपर्यंत तब्बल ९० प्रतिकृती बनविल्या आहेत. या प्रतिकृती बनवितानाही या कलाकारांनी केवळ कागद, लाकूड व भाताचे काड याचाच वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.या शासकीय स्टॉलच्या प्रतिकृती बनविण्याचे काम कोयनावसाहत येथील नीलिमा राजकुमार बाबर व राजकुमार बाबर या हौशी कलाकार दाम्पत्याने स्वीकारले आहे. त्यांना नीलिमा यांचे बंधू संभाजी घडलिंग यांची साथ मिळाली आहे. या कलाकारांनी अगदी झोपडीपासून विविध प्रकारच्या विकसित घरांच्या व मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती बनविल्या आहेत. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन, बागेतील खेळणी यांच्यासह वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून उपग्रहासह त्या उपग्रहाचे कंट्रोलरूम व टॉवरही हुबेहूब बनविले आहेत.कलाकारांनी पंधरा दिवस अथक परिश्रम घेऊन शासकीय प्रतिकृतींना आकार देण्याचे काम केले आहे. या प्रतिकृती बनविताना प्लास्टिक व थर्माकोलसारख्या साधनांना फाटा देण्यात आला आहे. माउंट शिट प्रकारचा जाड कागद व फेव्हिकॉल, भाताचे काड, लाकडी पट्ट्या अशा वस्तूंचा वापर करून प्रतिकृती बनवितानाही कलाकारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रदर्शनासाठी १७ फूट उंचीचे सभामंडप आणि पिलरलेस सुपरस्ट्रक्चरचा वापर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कलाकारांचा छंदच वेडा एखाद्या कलाकाराचा छंद वेड लावण्यासारखाच असतो, असे म्हणतात. त्याच पद्धतीचे हे बाबर दाम्पत्य आहे. राजकुमार बाबर हे हवाईदलात २० वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या सांगली येथील नामांकित रक्तपेढीत नोकरी करत असेलेल्या बाबर यांच्या पत्नी नीलिमा या रोटरी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कलेचे छंदात रूपांतर करून माफक मानधनात अशा प्रतिकृती बनविण्याचा या दाम्पत्यांना जणू छंदच लागला आहे. दैनंदिन कामातून वेळ काढून छंद जोपासताना नीलिमा यांचा भाऊ संभाजींचीही त्यांना चांगलीच मदत होते. दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी कृषी प्रदर्शनाच्या प्रतिकृती बनविण्याची कला जोपासत आहेत. प्रदर्शनासाठी आकर्षक प्रतिकृती यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या शासकीय स्टॉलमध्ये माहिती तंत्रज्ञान, प्रकल्प, अविकसित व विकसित घरे, शेतीवरील पाणी व्यवस्थापन, स्वच्छ व निर्मल गाव, कृषीपर्यटन केंद्र, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणाऱ्या प्रतिकृतींचा समावेश करण्यात येणार आहे. चार वर्षांपासून कऱ्हाड, कोल्हापूर शहरातील प्रदर्शनात विविध विषयांवरील प्रतिकृती बनवून दिल्या आहेत. एकत्मिक पाणलोट क्षेत्र, पूर व्यवस्थापन, पर्यावरणसंवर्धन, आदर्श ग्राम, कृषी पर्यटन केंद्र, अशा प्रतिकृती प्रदर्शनात चांगल्याच आकर्षण ठरल्या आहेत. ‘राखाल निसर्गाचा समतोल सारा, तरचं मिळेल आयुष्याला अर्थ खरा !,’ हा संदेश तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींतून दिला जातोय.- नीलिमा राजकुमार बाबर, कलाकार, कोयनावसाहतउपग्रहाची प्रतिकृती ठरणार लक्षवेधी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनासाठी आकर्षक उपग्रह तयार करण्यात आले आहे. या उपग्रहात आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहेत. प्रदर्शनात उपग्रहाची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरणार आहे.