आदर्की महसुली मंडलात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्याबरोबर मृत्युदरही वाढल्याने तालुका प्रशासनाने बहुतांशी गावे बफर झोन जाहीर करून कोरोना साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला; पण स्थानिक प्रशासनाचा मेळ बसत नाही. गाव पुढारी कोरोनातही राजकारण करीत शासनाच्या लसीकरणाचा नारळ फोडण्यात वेळ घालवीत आहेत; पण संसर्ग थांबविण्यासाठी किराणा यासह इतर दुकानांसमोर होणारी गर्दी व चौकाचौकांत फिरणारे कोरोनाबाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक, विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई म्हटली की ‘तुझा माझा करीत’ संसर्ग वाढत आहे. पंचायत समितीचे भरारी पथक गावांना भेट देत आहे; पण कारवाईस नकारघंटा देत हात हलवत परत जात आहे. त्यामुळे कारभारी सतरा अन् गल्लोगल्ली भरतीय जत्रा असे चित्र आदर्की महसुली मंडलात दिसत आहे.
कारभारी सतरा अन् कोरोनात गल्लोगल्ली भरतेय जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST