शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

करंजे एमआयडीसीचा साक्षात्कार!

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

पालिकेला जाग : सहा महिन्यांपासून धूळखात पडलेल्या नोटिसांना फुटले पाय

सातारा : पालिकेच्या मालकीची औद्योगिक वसाहत शहरात आहे, हे सांगूनही कुणाच्या लक्षात येणार नाही. जागा उपलब्ध झाली नसल्याने साताऱ्याला मंजूर झालेले १00 खाटांचे महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना हाकेच्या अंतरावरील करंजे एमआयडीसीची भली मोठी जागा मोजक्या मंडळींच्या घशात कोंबण्याचा डाव नुकताच उघडकीस आला असून संबंधितांना धाडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या नोटीसांना अखेर पाय फुटले आहेत. लघुउद्योजकांना चालना मिळवून देण्यासाठी पालिकेने सुमारे ४0 वर्षांपूर्वी करंजे एमआयडीसीतील पालिकेचे भूखंड काही मोजक्या लोकांना भाडेतत्त्वावर दिले होते. ६0 जणांना मिळालेल्या या भूखंडाबाबत भाडेवाढ किंवा परवाना नूतनीकरण अथवा जागेचा फेरलिलाव अशी कोणतीही कार्यवाही पालिकेने केली नाही. त्यामुळे या भूखंडाच्या माध्यमातून मोजके भाडे पालिकेच्या तिजोरीत जमा होते. ज्या कारणासाठी ही जागा देण्यात आली होती, तो उद्देशच बाजूला पडल्याची वस्तुस्थिती पुढे येत आहे. काहींचे सिरॅमिक उद्योग सुरु आहेत. काहींनी याठिकाणी भंगाराचे व्यवसाय सुरु केले आहेत. वाटप केलेल्या जागेपेक्षा जास्त जागा संबंधितांनी गळबटल्या असून ही औद्योगिक वसाहत मरनासन्नतेकडे नेली आहे. ही औद्योगिक वसाहत म्हणजे केवळ भंगाराची दुकाने असं समीकरणच होऊन बसलं आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वी या जागेचे सर्व्हेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार संबंधित भूखंडधारकांनी त्यांना देण्यात आलेल्या जागेच्या दुप्पट ते तिप्पट जागेवर अतिक्रमण केले आहे. एक हजार भूखंडाच्या जागी तब्बल तीन हजार चौरस फूटांच्या जागेत हे अतिक्रमण झाल्याचे पालिकेच्या निदर्शनाला आले आहे. त्यानंतर पालिकेला खऱ्या अर्थाने जाग आली. एका नगरसेवकाच्या मागणीनंतर करंजे औद्योगिक वसाहतीची जाणीव पालिका प्रशासनाला झाली. त्यानंतर नोटीसी काढण्याबाबतच्या हालचाली झाल्या. मात्र, नोटीसी प्रत्यक्षात संबंधितांना देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जावा लागला आहे. (प्रतिनिधी)