शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांची नावे झळकणार फलकावर!, कऱ्हाड पालिकेचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 17:54 IST

कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ...

कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत. शासकीय करवसुलीचीही पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे.कऱ्हाड पालिकेने आतापर्यंत पाच कोटींची वसुली केली आहे. अद्यापही १४ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. त्यात शासकीय कार्यालयांची सव्वा कोटीच्या आसपास वसुली बाकी आहे. त्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून पाच पथकांकडे वसुलीची जबाबदारी दिली आहे. 

शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पंचायत समिती उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील तब्बल बाराहून अधिक विविध शासकीय कार्यालयांकडे पाच वर्षांपासून पालिकेची तब्बल सव्वा कोटी कराची थकबाकी आहे. त्यासोबत शहरातील नागरिकांकडूनही पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी शिल्लक आहे. पालिकेला कोरोनामुळे कोणतेही उत्पन्नाची स्रोत नसल्याने पालिकेने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पाणी व घरपट्टीच्या वसुलीसाठी मोठे निर्णय मुख्याधिकारी रमाकांत डाके घेत आहेत.शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पालिकेचा संकलित कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन डाके यांनी केले आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून तेथील नागरिकांच्या थकीत कराच्या वसुलीसाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. शासकीय थकबाकीही कोटीत आहे. या वसुलीचे आव्हान आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडTaxकर