पुसेगाव : पुसेगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत कमलाबाई अंभोरे यांनी ९ मते मिळवत तांबोळी यमुना बेगम मो. नुर यांना पराभूत केले. उपसरपंच पदासाठी सय्यद सादेक ईस्माईल यांनी १० मते मिळवत पंचशीला धाबे यांना पराभूत केले.
या ग्रामपंचायतीवर एकूण १५ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत लोखंडे, ग्रामसेवक, तलाठी यांनी काम पाहिले.
दरम्यान, या विजयानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे गावकऱ्यांनी कौतुक करत विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच कमलाबाई अंभोरे यांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आरोग्य व शिक्षण आणि पिण्याचे पाणी, गावातील रस्ते, सांडपाणी आदी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.