शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

तांबवे गटातील ग्रामपंचायतीत ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तांबवे ...

तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तांबवे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून साजूर, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डी या ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे. म्होप्रेत रयत आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

तांबवे ग्रामपंचायतीत दहा वर्षांनी सत्तांतर झाले. तेरा जागांपैकी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या. आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, रामचंद्र पाटील, पी. डी. पाटील, सतीश पाटील यांनी केले. तर विरोधी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल गटाला ५ जागा मिळाल्या. त्याचे नेतृत्व यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवासराव पाटील, उपसरपंच धनंजय ताटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील हे करीत होते.

साजुर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांच्या गटाने सत्ता अबाधित ठेवत नऊपैकी ६ जागांवर विजय मिळविला. तर उंडाळकर गटाच्या खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांच्या गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. म्होप्रे ग्रामपंचायतीत सर्वच नऊ जागांवर रयत विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्याचे नेतृत्व माजी सरपंच तुकाराम डुबल, संभाजी सपकाळ व पिनु पाटील यांनी केले. विरोधी विद्यमान पंचायत समिती सदस्या संगीता संकपाळ यांच्या गटाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. वस्ती साकुर्डी येथील ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला ६ जागा मिळवून सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले. तर विरोधी पाटणकर गटाला ३ जागा मिळाल्या.

मौजे साकुर्डी ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवत अ‍ॅड. विश्वास निकम, निवास शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या जोतिर्लिंग गटाने ५ जागांवर विजय मिळविला. तर विरोधकांना २ जागांवर समाधान मानावे लागले. गमेवाडी ग्रामपंचायतींमध्ये सातपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. तर ४ सदस्य निवडून आणून मंत्री शंभूराज देसाई गटाने सत्ता मिळवली. संतोष जाधव यांनी विजयी पॅनेलचे नेतृत्व केले. बेलदरे ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी शंभूराज देसाईं व उंडाळकर गटाला ४ जागांवर विजय मिळवता आला. तर विरोधी गटाने ४ जागांवर विजय मिळविला.

- चौकट

वसंतगड ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना चपराक

तांबवे जिल्हा परिषद गटातील वसंतगड ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली असून तेथे सत्तांतर झाले आहे. खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती रघुनाथ नलवडे यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करत विरोधकांना चपराक दिली आहे. किरपे ग्रामपंचायतही यापूर्वी बिनविरोध झाली आहे. तेथेही आघाडीची सत्ता आहे. गमेवाडीत सत्ता अबाधित राहिली आहे.

फोटो : १८केआरडी०३

कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाउ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.