शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तन्वीन ठरली ज्युदोत सिक्रेट सुपरस्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:34 IST

स्वप्नील शिंदे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आमीर खानच्या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटात इनसियाने आपल्या स्वप्नांसाठी कुटुंब आणि समाजाशी ...

स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आमीर खानच्या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटात इनसियाने आपल्या स्वप्नांसाठी कुटुंब आणि समाजाशी केलेल्या संघर्षाची कहानी मांडली आहे. अशाच प्रकारचा संघर्ष करून तन्वीन तांबोळीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाच्या ज्युदो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.तन्वीन तांबोळी ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा येथील असून, ती शिक्षणानिमित्त रहिमतपूर येथे आजोंबाकडे राहत होती. लहानपणापासून ती खेळामध्ये चमकत असल्याने तिचे आई-वडिलांनी दिला प्रोत्साहन दिले. तिची आई शिक्षिका व वडील नगरपालिकेत नोकरीत असल्याने त्यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी मुस्लीम समाजात असलेल्या पारंपरिक विचारांना छेद देत आपल्या मुलीला क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.त्यासाठी तिला पुणे येथील क्रीडा प्रबोधनीत प्रवेश घेतला. तिची तंदुरुस्ती व क्षमता पाहून क्रीडा शिक्षक राजीव देव यांनी ज्युदोवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य मानून तन्वीनने ज्युदोचा सराव सुरू केला. मधुश्री काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा नियमित सराव सुरू आहे. ज्युदोसारख्या खेळात करिअर करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या समाजातील काही लोकांना आश्चर्य वाटले, थोडासा विरोधही झाला.तिचे वडील रफिक व आई जास्मीन यांनी विरोधाला न जुमानता आपल्या मुलीच्या खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. हळूहळू तन्वीने विविध स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर समाजातील लोकांचा विरोध मावळला. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. २१ वर्षांखालील वयोगटात तिने ७० किलोखालील विभागात यश संपादन केले आहे. त्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला.