शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज कॅन्टीनमधून जंकफूड होणार हद्दपार - : प्राचार्यांना नोटिसा अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:46 IST

पारंपरिक अन्नामध्ये जंकफूडचा समावेश झाल्यापासून नानाविध रोगांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. हे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कॉलेजचे कॅन्टीन. या कॅन्टीनमधूनच जंकफूड कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा निर्णय आता अन्न व औषध प्रशासनाने

ठळक मुद्देऔषध प्रशासनाची आक्रमक भूमिका

दत्ता यादव ।सातारा : पारंपरिक अन्नामध्ये जंकफूडचा समावेश झाल्यापासून नानाविध रोगांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. हे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कॉलेजचे कॅन्टीन. या कॅन्टीनमधूनच जंकफूड कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा निर्णय आता अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालयांतील प्राचार्यांना तत्काळ नोटिसाही बजावण्यात येत आहेत.

पूर्वी हॉटेलमध्ये शिरा, उपीट, मटकीची उसळ, पोळी भाजी, अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मिळत होते. खरंतर हे पदार्थ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे होते. कॉलेज कॅन्टीनपासून सर्वच हॉटेलमध्ये हे पदार्थ सहजासहजी मिळत होते. परंतु अलीकडे स्पर्धेच्या चढाओढीत हॉटेलमध्ये पारंपरिक पदार्थांची जागा जंकफूडने घेतली. शिरा, उपीट यासारखे पदार्थ नाष्ट्यासाठी मागणे हे हल्लीच्या मुलांना म्हणे कमीपणाचे वाटू लागलेय. त्यामुळे चमचमीत असे पिझ्झा, बर्गर, चिप्स, सामोसा, बटाट्याचे प्राईझ अशा प्रकारचे जंकफूड पदार्थ खाणे युवक-युवती पसंत करत आहेत.जंकफूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात होते.

कॅन्सरसारखा भयानक रोग जंकफूडच्या सेवनातून झपाट्याने वाढत असल्याचे वैद्यकीय निष्कर्षातून उघड झाले आहे. तरुण पिढी याला बळी पडत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्वच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये यापुढे जंकफूड दिसणार नाही, यासाठी या विभागाने मोहीम उघडली असून, संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांना अन्न व सुरक्षा मानद कायद्याचे पालन करून जंकफूडसारखा पदार्थ विक्रीस न ठेवण्याच्या सूचना कॅन्टीन चालकांना तत्काळ द्याव्यात, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशा प्रकारच्या नोटीसा दिल्या आहेत.

प्राचार्यांना नोटिसा पोहोचल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅन्टीनमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये जंकफूड विक्रीस ठेवलेच नाही तर मुलांना त्याचे गांभीर्य समजेल आणि मुले जंकफूड खाण्यापासून परावृत्त होतील, हा उद्देश या पाठीमागचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालय परिसरातही असलेल्या हॉटेल चालकांना नोटिसा देण्यात येत आहेत. कॅन्टीनमध्ये स्वच्छतेबरोबरच अन्नपदार्थांचा दर्जा चांगला ठेवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गिºहाईक कमी झाले तरी चालेले; पण मुलांच्या आरोग्याशी खेळू नका, असे आवाहनही करण्यात येत आहे.चार पथके...कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जंकफूड विक्री केले जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने चार पथके तयार केली असून, ही पथके अचानक कॅन्टीनची तपासणी करणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत कडक धोरण अवलंबले आहे.

 

जंकफूडमुळे अनेक आजार होत आहेत. अन्न व सुरक्षा मानद कायद्यानुसार हे पदार्थ विक्रीस ठेवणे गुन्हा आहे. त्यामुळे कॅन्टीनमध्ये हे पदार्थ विक्रीस ठेवूच नयेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याचे पालन न केल्यास संबंधित कॉलेज आणि कॅन्टीन चालकावर गुन्हे दाखल केले जातील. 

- शिवकुमार कोडगिरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त

टॅग्स :Professorप्राध्यापकSatara areaसातारा परिसर