फलटण : फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीबरोबरच बनावट दारूविक्रीचे मोठे पेव फुटले आहे. शरीराला अपायकारक ठरणाऱ्या बनावट व अवैध दारूविक्रीकडे उत्पादन शुल्क व पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.फलटण तालुक्यात ग्रामीण भागात बनावट दारू तयार करण्याचे पेव फुटले आहे. अनेक ठिकाणी हातभट्ट्या सुरू असून, कधीतरी पोलीस कारवाई करते. व साहित्य जप्त करते; मात्र यामध्ये सातत्य राहत नसल्याने दारूच्या व्यवसायाचे चांगलेच पेव फुटले आहेत. फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल, ढाब्यांची संख्या आहेत. यातील बहुसंख्य जणांकडे कोणत्याही प्रकारचा दारूविक्रीचा परवाना नाही; मात्र पोलीस व उत्पादक शुल्क कारवाई करीत नसल्याचा फायदा उचलित ज्यांना दारूविक्रीचा परवाना नाही. बहुसंख्येने हॉटेल्स व ढाब्यावर अवैध दारूविक्री सुरूच आहे. या दारूमध्ये भेसळ केली जात आहे. काहीजण बाहेरील दारू आणून विकत असल्याचे आढळून येत आहे. शरीराला अन्यायकारक ठरणाऱ्या या बनावट दारूमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तालुक्यात उत्पादन शुल्क अस्तित्वात आहे की नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती या खात्याची दिसून येत आहे. कधीतरी झोपेतून जागे झाल्यागत दाखवायची म्हणून कारवाई करताना उत्पादन श्ुाल्कवाले दिसून येत आहे. या खात्याचा तालुक्यात भोंगळ आणि तडजोडीचा कारभार प्रामुख्याने दिसून येत आहे.अनेकांची राजकीय आश्रयखाली अवैधरीत्या हॉटेल, ढाब्यांमधून दारूविक्री सुरू आहे. मध्यंतरी पंचायत समितीमधील एका सदस्याशी संबंधित ढाब्यावर मोठ्या प्रमाणात बनावट दारू पकडण्यात आली. यानंतर बनावट दारूवर उत्पादन शुल्क व पोलिसांनी सातत्याने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने याचे पेव दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)दारूबंदी चळवळ हवेतच..तालुक्यात अवैध व बनावट दारूचे प्रचंड पेव फुटलेले असताना कधीतरी यावर उतारा म्हणून छोटीशी कारवाई पोलीस किंवा उत्पादन शुल्क खात्याकडून केली जाते. उत्पादन शुल्कवाले तर मोठी कारवाई कधीच करताना दिसून येत नाही. पोलीस व उत्पादन शुल्कवाले सहकार्य करीत नसल्याने तालुक्यात दारूबंदीची चळवळ लांबलेली आहे.
हातभट्ट्या जोमात; प्रशासन कोमात
By admin | Updated: August 27, 2015 23:03 IST