अजित जाधव-महाबळेश्वर -महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे सध्या लालचुटूक स्ट्रॉबेरीबरोबरच रसाळ मलबेरी पर्यटकांना भुरळ पाडत आहे. आंबट-गोड चवीची मलबेरी सध्या पर्यटकांच्या चांगलीस पसंतीस पडत आहे.मलबेरी म्हणजेच तुती. ज्यापासून रेशीम तयार होतं त्या तुतीच्या झाडालाच रसरशीत तुतीची फळं लगडतात. इंग्रजीमध्ये याचं नाव मलबेरी. सुंदर रेशीमधाग्याप्रमाणंच तुतीचं फळही पूर्ण पिकल्यानंतर रसाळ आणि मधुर लागतं. मलबेरी ही स्ट्रॉबेरीसारखीच रसरशीत असून चवीला गोड असतात. अर्धकच्ची मलबेरीची चव आंबट-गोड असून त्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. तुतीचे पीक तयार होण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तालुक्यात लिंगमळा, अवकाळी, मेटगुताड, भेकवली या भागात तुती मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल-मे हंगामात स्ट्रॉबेरीबरोबरच मलबेरी, राजबेरी, आंबुळकी, जांभूळ, तुगबेरी अशी विविध प्रकारची आणि वेगवेगळ्या चवीची फळे विक्रीसाठी येतात. ही फळं पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करत आलेली आहेत. उन्हाळा अन् हिवाळ्यात दर्शन‘मलबेरी’ची चव पर्यटकांना दोन हंगामात चाखता येथे. उन्हाळा आणि हिवाळा या दोन हंगामात मलबेरी बाजारपेठेत विक्रीसाठी येते. सध्या महाबळेश्वरमध्ये सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यातच आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रसाळ मलबेरीचा हंगामही सुरू झाल्यामुळे पर्यटक मलबेरीची चव आवडीने चाखत असल्याचे पाहायला मिळते. मधुर मलबेरी शंभर रुपये किलोपूर्णपणे पिकलेल्या मलबेरीची चव अत्यंत गोड असते. एक वेगळी चव जिभेवर रेंगाळत ठेवणारं हे फळ शंभर रुपये किलो दराने विक्री होत असले तरी त्याला पर्यटकांमधून मोठी पसंती मिळते. मलबेरीमध्ये औषधी गुण असून तिच्यापासून बनविलेले सरबत, जाम जेली, चॉकलेट, आईस्क्रिम या पदार्थांनाही मोठी मागणी आहे.
स्ट्रॉबेरीच्या जोडीला आली रसाळ मलबेरी
By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST