शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रा म्हणजे पन्नास वर्षांचे पाप

By admin | Updated: April 23, 2017 22:42 IST

सदाभाऊ खोत यांची टीका : विरोधकांच्या काळात आंदोलनावेळी शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम

पाटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने गेल्या ५० वर्षांच्या सत्तेत शेतकऱ्यांसाठी कोणतीही गुंतवणूक केली नाही. नवीन तंत्रज्ञान आणले नाही. आता कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत असून,त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा यायला लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याचे काम त्यांच्याच सरकारने केले. म्हणूनच आजची संघर्ष यात्रा म्हणजे ५० वर्षांचे पाप आहे,’ अशी परखड टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन, देसाई कारखाना यांच्या वतीने आयोजित दौलत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री खोत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला नियमनमुक्ती विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात शंभर ठिकाणी शेतकऱ्यांचे बाजार सुरू झाले आहेत. ऐवढंच काय मंत्रालयात पायरीवर सुद्धा शेतकरी शेतीमाल विकू शकतात. जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याचा थेंब न् थेंब साठविता आला पाहिजे. म्हणून ५२ कोटी रुपये उभे केले आहेत. नाबार्डच्या माध्यमातून ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ या कार्यक्रमास रविराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, नारायण शिसोदे, जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी के.एस. गौतम, कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य...‘आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. ७० हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारने शेती व पाण्याच्या योजनांसाठी खर्च केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात. तर मग आज ०.२० टक्के जमीनसुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून ओलिताखाली आलेली नाही असे सांगत टीका केली. भाजप-सेना युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त कसे करता येईल, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.