शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हा समाजाचा आरसा : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:04 IST

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या ...

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मनसेचे राज्यसरचिटणीस संदीप देशपांडे, भाजपचे भरत पाटील, सारंग पाटील, परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘पत्रकार समाजाचा डोळा असतो. तो चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देतो. त्याचबरोबर वाईट गोष्टीही समाजासमोर मांडतो. मनोरंजनाबरोबरच दैनिकातून शिक्षण देण्याचे काम केले जाते. वर्तमानातील माहिती आणि भविष्याचे संकेत देण्याचे काम वर्तमानपत्रे करत आहेत.’जयंत पाटील म्हणाले, ‘पत्रकारांना आपल्या मागण्यांसाठी अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत, ही खेदाची बाब आहे. राज्य शासन करत असलेल्या कामातील त्रुटींची माहिती वर्तमानपत्रातून कळते. पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही खेदाची बाब आहे. आजच्या पत्रकाराला विविध दहशतीतून जावे लागत आहे. ’आठ संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘आमचे प्रश्न आमच्या व्यथा’ यातून ग्रामीण पत्रकांराना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्यात आला. आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. शंकर मोहिते यांनी स्वागत केले. शरद काटकर यांनी प्रास्ताविक केले. शरद पाबळे यांनी आभार मानले